विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे

 


दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे
भाग १
शिवपूर्व काळात आणि शिवकाळात महाराष्ट्राला दक्खन प्रांत किवा दक्खन ए सुभा असे म्हटले जायचे .
दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या तुलनेत सुखासीन लोकांनी नव्हे, तर सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रांगडय़ा, राकट, कणखर लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वराज्याच्या कामात मोलाची साथ दिली...
भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेकडे जेव्हा आपण इतिहास या दृष्टिकोनातून पाहतो, त्या वेळी एखाद्या अभ्यासकाच्या मनात पहिला विचार येतो की, ही घटना कशी घडली असेल, कोणती कारणे यामागे असतील.. राजकीय की सामाजिक? आíथक की सांस्कृतिक? एखाद्याच्या विषयाच्या अभ्यासानुसार, ज्ञानाच्या व्याप्तीनुसार अनेक कारणे सांगता येतात. मात्र एक विषय असा आहे की, ज्याकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही, कारण त्या विषयाचा एखाद्या घटनेशी वा प्रसंगाशी काही संबंध असेल याची जाणीव भल्या भल्या संशोधकांपाशीही कधी कधी नसते.
इतिहासाची संगती लावताना, एखाद्या घटनेचा अन्वय लावताना, त्या त्या प्रसंगातील दुव्यांची साखळी तयार करताना आपण नेमका भूगोल विसरतो. चूक अक्षम्य तर खरीच, मात्र ती होते. देवाला जाताना श्रीफळ विसरावे ती गत होते.
सतराव्या शतकातील- शिवकाळातील- दख्खनच्या इतिहासाचा विचार करताना जाणवते की, हा कालखंड साऱ्याच दृष्टिकोनातून निश्चितच क्रांतिकारी ठरला. दख्खनच्या व दक्षिणेच्या राजकीय पटलावर मराठय़ांचे वाढते प्रस्थ ही या काळातील वैशिष्टय़पूर्ण घटना म्हणावी लागेल. या सामाजिक व राजकीय बदलांचे परिणाम स्थानिक, सामाजिक, आíथक, धार्मिक जीवनावर उमटणे हे अतिशय स्वाभाविक होते. या संदर्भात विचार करताना शिवकालीन समाजाचा गावगाडा कसा चालत होता हे जाणून घेणेही रंजक ठरेल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...