विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण(१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)

 


हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण(१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)

उदाजीराव चव्हाण यांचा जन्म १६८० मध्ये झाला ,उदाजीरव हे डिग्रजकर चव्हाण घराण्यातील ,सरसेनापती संताजी घोरपडे यांना मदत करणाऱ्या हिम्मत बहाद्दर विठोजी चव्हाण यांचा हा पुत्र होता.
या चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष बालोजी. त्यांचे पुत्र राणोजीराव चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वाचे सरदार आणि लष्करातमोठय़ा हुद्दय़ावर काम करत होते.
राणोजीरावांनी महाराजांसोबत बऱ्याच मोहिमांत भाग घेतला होता. सुरतेच्या स्वारीत राणोजीराव होते, असा उल्लेख सापडतो. नंतर सिद्दी जोहरच्या जंजिरा मोहिमेत लढत असताना ते धारातीर्थी पडले. त्यांचे दोन पुत्र होते पैकी मोठे विठोजीराव व धाकटे मालोजीराव. विठोजीराव वयाने साधारण १८ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरदार बनवले व त्यांना एका तुकडीवर लष्करी अधिकारी नेमून स्वराज्य सेवेत सामावून घेतले. महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतही विठोजीरावांनी लष्करी सेवा इमानेइतबारे पार पाडली.
दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही व मराठय़ांचे स्वराज्य संपवण्याचे ठरवून औरंगजेब १६८१-८२ सालात दक्षिणेत उतरला. औरंगजेबाला मराठय़ांनी सलग ८ वष्रे स्वराज्यातील एकही किल्ला जिंकू दिला नव्हता. मोगलांनी १६८९ साली दगा करून संभाजी महाराजांना संगमेश्वर मुक्कामी पकडून औरंगजेबाच्या हवाली तुळापूर येथे दिले. तिथे औरंगजेबाने त्यांचे हाल करून क्रूरपणे हत्या केली. याचा राजा असलेल्या संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे आणि विठोजीने औरंगजेबाचा सूड घेण्याचे ठरवले. हे घोरपडे बंधू व विठोजीने निवडक १५० शिलेदारांसह तुळापूर मुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, पण औरंगजेब त्याच्या तंबूत सापडला नाही. त्यामुळे चिडलेल्या संताजी व विठोबानी तंबूचे तणाव घाव घालून तोडले, तंबू खाली पडला तेव्हा त्यांच्या खांबावर असलेले दोन सोन्याचे कळस काढून घेतले. परतताना त्यांनी सिंहगडाचा पायथा गाठला. तिथे किल्लेदार असलेल्या सिद्धोजी गुजर यांनी या लष्कराची सर्व सोय केली.
त्याच वेळी मोगल सरदार झुल्फीकार खान कोकणातून लूट घेऊन पुण्यास जात असताना त्याच्यावर हल्ला करून घोरपडे बंधूंनी त्यांचा पराभव केला व सर्व खजिना लुटला आणि तीन हत्ती काबीज करून हे सर्व पन्हाळगडावर छ. राजाराम महाराजांना सादर केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महाराजांनी घोरपडे बंधूंना ‘ममलकतदार-ए-िहदूराव’ हा किताब दिला आणि विठोजीना ‘हिम्मतबहादर’ असा किताब, शिक्के व कटय़ार देऊन सन्मान केला. कर्नाटकात युद्ध सुरू असताना महानगर ऊर्फ बंगलोर इथे २२ मे १६९९ रोजी विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र उदाजी याला राजाराम महाराजांनी हिम्मतबहादर पदाची वस्त्रे दिली. तालुका विजापूर व ठाणे मनगुत्ति वगैरे अठरा परगणे ,शिरोळ रायबाग वगैरे जहागिरी याच्य्कडे होत्या.
१७३२ रोजी सगुणाबाई िनबाळकर व िहदूराव घोरपडे यांना शाहूंची जी आज्ञापत्रे पाठविण्यात आली त्यात उदाजीरावांना ‘हिम्मतबहादर’ व ‘ममलकतदार’ असे दोन किताब लावलेले दिसतात. पैकी हिम्मतबहादर हा किताब जुना आहे. उदाजीही त्यांच्या पूर्वजाप्रमाणे पराक्रमी होते. शाहू आल्यावर ताराबाईंच्या पक्षात जाऊन ते बत्तीस शिराळ्यात गढी करून राहिले होते.
उदाजी व दामाजी थोरात हे सातारा प्रांतापर्यंत स्वारी करत व चव्हाणचौथाई वसूल करत, गाव लुटत असा कार्यक्रम सुरूच होता. शत्रूच्या मुलखातून जबरदस्तीने चौथाई वसूल करण्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांची. परंतु ही चौथाई प्रत्यक्ष स्वराज्यात उदाजीराव चव्हाण वसूल करत असल्याने त्याला कुचेष्टेने चव्हाण चौथाई असे नाव मिळाले होते, असे उल्लेख कागदपत्रात आहेत. याचा त्रास एवढा जाणवत होता की, त्या त्या प्रांतातील सरदारांनाही या अरिष्टनिवारणार्थ आपापल्या प्रजेवर ‘चव्हाणपट्टी’ असा एक स्वतंत्र कर लादला होता, आणि त्या पैशातून ते फौजा बाळगून उदाजीरावांशी लढा देत.
ताराबाई राणी सरकार यांच्यातर्फे सेनापती चंद्रसेन जाधवराव यांच्या सोबत छत्रपती शाहू महाराजांशी यांनी लढा दिला,यांची गाधी बत्तीस-शिराळ्यास होती,शाहू महाराजांनी उदाजीरावास कैद केले होते परंतु वारणेच्या तहानुसार ते परत कोल्हापूरकर छत्रपती यांच्याकडे गेले. उदाजीरावांचे चुलते मालुजी चव्हाण यांना इ.स. १७३८ मध्ये डिग्रज हा सरंजाम म्हणून शाहूराजाकडून मिळाला होता. शिवाय कर्नालपैकी निम्मा गाव त्यांना पालखीच्या खर्चासाठी शाहूंनी इ.स. १७४४ साली दिला होता. मिरज प्रांतापैकी फक्त हे दीड गाव आता या घराण्याकडे चालू राहिले.
अशा या पराक्रमी उदाजीरावांचा मृत्यू नेमका कसा झाला याची खात्रीलायक माहिती नाही. मृत्यूबाबत पहिला उल्लेख कै. रथाजीराव चव्हाण यांनी आपल्या कैफियतीत यासंबंधी जो मजकूर लिहून ठेवला आहे त्यानुसार इ.स. १७६२ च्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या विरण्यात योद्धय़ाचा एका लढाईत अंत झाला. अक्कलकोटकर व हिम्मतबहादर यांचे एका हद्दीच्या गावाबद्दल कलह चालू होता. तेथे लढाई झाली त्यात उदाजीराव ठार झाले.
दुसरा उल्लेख 'मिरज प्रांती एका खेड्यावर उदाजीने रोख केला,गावकऱ्यांनी मानला नाही.उदाजीने गावावर स्वारी केली,त्या प्रसंगी उदाजीचे घोडीस गोळी लागून उधळली .रिकिबीत पाय अडकून डोके फुटून मेले '
त्यांचे पुत्र विठोजीराव व प्रीतीराव हे उभयता नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे होते. त्यांनी उदाजीरावांचा देह नळदुर्गला आणून अणदूर येथील श्रीखंडोबा मंदिराच्या बाहेर त्यांची समाधी बांधली. नंतर विठोजीराव डीग्रजेस तर प्रीतीराव करवीर नरेश छत्रपती शिवाजी महाराजांपाशी राहिले .
उदाजी राव चव्हाण यांची उत्कृष्ट समाधी बांधलेली आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...