विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 September 2020

परमार पवार राजांचा राज्यकाळ भाग १

 



परमार पवार राजांचा राज्यकाळ
भाग १
इस सन १३१० ते १७०७ पर्यंत परमार वंश ₹ महाराष्ट्र आणि वैनगंगा या प्रदेशात स्थिरावत होता. माळवा आणि धार वर पुन्हा पवार राज्य ( मराठा पवार ) : सन १७२५ ते १९४७ - ४८ पर्यंत. छत्रपती शाहूंचे मराठा सरदार उदाजीराव पवारांनी सन १७२३ मध्ये माळवा प्रदेश जिंकला पण नंतर बाजीराव पेशवा यांच्याशी वाद झाल्याने त्यांचे छोटे बंधू आनंदराव पवार यांना सन १७३२ ते १७३५ पर्यंत त्यांना धार चे राजे बनवले गेले
  • विक्रमादित्य प्रथम : इसा से ५७ वर्षा पूर्वी
  • द्वितीय विक्रमादित्य : ४ थे शतक _ कालिदास च्या वेळी
  • कृष्णराज उर्फ उपेंद्र : सन ८०० ते ८२५
  • वाक्पंती प्रथम ; सन ८७५ ते ९१४
  • वाक्पंती द्वितीय / मुंजदेव : सन ९७४ ते ९९७
  • सिन्धुलराज /नव शशांक : सन ९९७ ते १०१०
  • राजा भोजदेव प्रथम : सन १०१० ते१०५५
  • जयसिंह : सन १०५५ ते १०५९
  • उदायादित्य : सन १०८० ते १०८६
  • जगदेव परमार : सन १११६ ते ११६८
  • नरवर्मनदेव : सन ११०४ ते११३३ ( भाई ल्क्ष्मणदेव नन्दीवर्धन ( नागपूर ) चे महाराज
  • यशोवर्मन : सन ११३३ से ११४२
  • जयवर्मन : सन ११४२ ते ११६०
  • विंध्यवर्मन : सन ११६० ते११९३
  • सुभातवर्मन : सन ११९३ ते १२१०
  • अर्जुनवर्मन : १२१० ते १२१६
  • देवपाल : सन १२१६ ते १२४०
  • जयतुर्गादेव : सन १२४० ते १२५६
  • जयवर्मन द्वितीय : १२५६ ते १२६१
  • जयसिंह तृतीय : सन १२६१ ते १२७०
  • अर्जुनवर्मन द्वितीय : सन १२७० ते १२८०
  • भोजदेव द्वितीय : सन १२८० से १३१० ( अल्लाउद्दिन खिलजी कडून पराभव )
  • पवार घराण्याचा दर्जा पूर्वी पासून फार उच्च कुलीन आहे. हे घराणे राजपूत असून दक्षिणेत ९६ कुळी मराठ्यात सामील झाले. पवार घराण्याला पूर्वी पासून वेदोक्तांचा अधिकार आहे. कृष्णाजी राजे पवार यांना ब्रम्हेन्द्र स्वामी यांनी लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की तुम्ही (कृष्णाजी राजे पवार विश्वासराव) जातीने क्षत्रिय, सात जाती दिल्लीहून आल्या त्यात तुमची जात उत्तम आणि तुम्हास सूर्य गायत्री आणि यज्ञोपावीत (जाणवे) होते.. उत्तर हिंदुस्तानात मावळ व राजपुताना ह्या प्रांतात परमार उर्फ पवार ह्या घराण्याचे राज्य कित्येक शतके चालू होते. मुस्लिमांच्या आगमना नंतर उत्तरेतील हिंदू साम्राज्यास उतरती कळा लागून पुढे राज्य लयास गेले, तेव्हा त्यांच्या घराण्याच्या अनेक शाखा निरनिराळ्या मुलखांत जाऊन स्थायिक झाल्या. त्यातील एक शाखेचा उदय महाराष्ट्रात १७व्या शतकाच्या आरंभास झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...