विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 September 2020

शिवाजीराजे& गोमाजी नाईक पानसंबळ

 



शिवाजीराजे& गोमाजी नाईक पानसंबळ
शिवाजी महाराजांचे शस्त्र प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ हे होते, ही वस्तुस्थिती खूपच थोड्या लोकांना माहिती असेल. गोमाजी नाईक यांच्या अखत्यारित शिवाजी महाराजांचे बालपणापासूनचे शस्त्र आणि युद्धनीतिचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. शहाजी राजांच्या लग्नानंतर लखोजी जाधवरावांनी मुलगी जिजाबाई यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट तलवारबाज आणि युद्धनीतितील पारंगत वीर, सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांची नेमणूक केली होती
शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती. अगदी याच काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांच्या सल्ल्यावरुन शिवाजी महाराजांनी लढवय्या पठाणी तुकडीला आपल्या सैन्यात सामाऊन घेतले होते
जिजाबाई आणि शिवाजी राजे हे इ.स. १६३६ ते १६३९ या कालावधीत शहाजी महाराजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते. येथे देखील शिवाजी महाराजांचे पुढील प्रशिक्षण सुरुच होते. शिवाजी राजांना बालपणी सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेशिवाय सरदार बाजी पासलकर यांचे देखील तलवारबाजी आणि युद्धकलेतील निपुणतेचे मार्गदर्शन मिळाले होते
सरदार गोमाजी नाईक पानसंबळ हे सतराव्या शतकातील शिवाजी राजांच्या सैन्यातील एक पराक्रमी सरदार आणि मिलिटरी अॅडव्हायझर होते. ते शिवाजी राजांचे खरेखुरे गुरू होते. लखोजी जाधवराव यांनी ज्या इराद्याने त्यांची नेमणूक केली होती, अगदी तो इरादाच सार्थ करण्याचे काम जणू सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांनी केले होते
शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळात सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शिवाजी राजांचे प्रशिक्षक बनून अशी दुहेरी भूमिकेतून काम करीत त्यांनी शिवाजी राजांना तलवारबाजी, घोडेस्वारी, युद्धनिती आणि शस्त्रांचा उपयोग कसा करावा, वगैरे गोष्टी शिकवल्या. या स्वराज्याच्या अंकुरातून शिवाजी महाराजांनी त्याचा पुढे वटवृक्ष बनवला
गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शिवाजी राजांना तलवारबाजीचे प्रशिक्षण देतानाच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचे मराठा युद्धनीतितील मौलिक धडे दिले. गोमाजी नाईकांच्या विचाराच्या धड्यातून खूप सारे कष्ट घेत शिवरायांनी आपले कर्तृत्व निर्माण केले. आणि यातूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत पुढे त्यांनी आपले स्वराज्य उभे केले
नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. *सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...