विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 September 2020

•••शिवकाळातील जमिनीची वर्गवारी••


 

•••शिवकाळातील जमिनीची वर्गवारी•••
शिवाजी महाराजांनी जमिनीची पहाणी करून जमिनीची वर्गवारी केली आणि त्याप्रमाणे सारा आकारला जाऊ लागला.
शिवकाळात जमिनीची मोजणी करण्यासाठी "शिवशाही काठी" वापरली जात असे. या काठीच्या लांबीविषयी सभासद बखरीत म्हटले आहे,
"पाच हात पाच मुठीची काठी, हात चवदा तसून असावा. हात व तसू मिळून बैंशी तसूंची लांबी काठीची, वीस काठ्या औरस चौरस त्याचा बिघा एक. बिघे एकशे वीस यांचा एक चावर. अशी जमीन मोजून गावंची गाव चौकशी केली"
(संदर्भ- कृष्णाजी अनंत सभासद विरचित सभासदाची बखर)
(यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्यापैकी जे कोणी शेतकरी बांधव असतील त्यांनी चावर (किंवा त्याचा अपभ्रंश चाहुर) असा शब्द नक्कीच ऐकला असेल तर एक चावर म्हणजे 120 बिघे किंवा साठ एकर होय)
या शिवशाही काठीची लांबी सर्व ठिकाणी सारखीच नव्हती. काही ठिकाणी 82 तसूंच्या ऐवजी 84 तसूंची काठी असल्याचेही आढळते. या पद्धतीने केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीला 'बिघावणी' 'चावराणा' किंवा चकबंदी म्हणत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरासदार यांचे अधिकार कमी केले. आणि गावांच्या हद्दीत ठरवून दिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित केले. शेतकऱ्याने एकंदर उत्पन्नाचे तीने हिस्से स्वतःकडे ठेवून दोन हिस्से सरकारला द्यावे. याला महत्त्व दिले.
नवीन येणाऱ्या रयतेस गुरेढोरे, बि-बियाण्यासाठी पैसे द्यावेत आणि ते नंतरच्या दोन-चार वर्षांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे वसूल करुन घेतले जात असत.
(संदर्भ- कृष्णाजी अनंत सभासद विरचित सभासदाची बखर)
शिवाजी महाराजांचा मंत्री मोरोपंत पिंगळे याच्याकडून करमुक्त जमिनी बाजारपेठ बसविण्यासाठी दान दिल्या जात असत.
(संदर्भ- मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठ पान-२४)
जर्व्हिस ने केलेल्या कोकणच्या पाहणीत जी अचूक आकडेवारी आहे त्यात शिवकालीन माहिती आढळते.
(संदर्भ- Statistical survey of kokuan)
जिल्ह्यांच्या प्रत्येक महालातील एक-दोन गावांच्या पिकांची लागोपाठ तीन वर्षे पाहणी करून त्या माहितीच्या आधारे त्याने तालुकानिहाय प्रत्येक प्रकारच्या जिल्ह्यावरील कर निश्चित केला. तो देखील निम्मा धान्य रुपाने आणि निम्मा ठराविक रकमेत सवलतीच्या दराने अशा स्वरूपात घेतला जाई.
धन्यवाद.
@maratha_riyasat

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...