निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
शिवाजी महाराज हे अतिउत्तम सेनानी (leader) होते. त्यांची नेतृत्वशैली हे leading from the front अशी होती. आपण राजा जपून राहून राहून प्राण वाचवून आयुष्य जगण्याची निती त्यांची नव्हती. त्यांच्या एका हाके वर लाखो मावळे जीव द्यायला तयार होते, तरीही एक राजा म्हणून, एक पालक म्हणून शिवाजी महाराजांनी आपले कर्तव्य बजावले.
महाराजांच्या उपस्थितिने मावळ्यांचा अंगात अधिक उत्साह आणि ऊर्जा संचारत. अनेक स्वार्यांमध्ये महाराज कायम स्वतः जातीनिशी उतरत असत.
आपण अफजल खानाच्या वधाचा प्रसंग आपण ध्यानात घेऊयात. महाराजांना ठाऊक होते की दगा होण्याची शक्यता अधिक आहे . त्यांच्या ठिकाणी त्यांच्या सारखा दिसणारा उभेहुभ दुसरा व्यक्ती पाठवता आला असता. पण स्वतः महाराज जेव्हा गेले व त्यांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा संपूर्ण हिंदुस्तानात त्यांच्या नावाचा डंका वाजला. सर्वांना शिवाजी महाराज हे नाव ठाऊक झाल. अफझलखनच्या मृत्यू नंतर अवघ्या २ आठवड्यात त्यांनी पन्हाळा पर्यंत चा मुलुख काबिज केला. यावरून आपण महाराजांचा त्यावेळचा दरारा जाणु शकतो. महाराजांचा नाव ऐकूनच किल्लेदार किल्ले सोडून जात. ह्या प्रसंगा नंतर महाराजांचा दरारा खूप वाढला. म्हणून स्वतः महाराज यांनी नेतृत्व करणे हे महत्त्वाचं ठरलं .
शाइस्ताखानाने तर दख्खन मध्ये उतरताच लाल महालामध्ये दोन वर्ष मुक्काम केला. यावेळी शाइस्ताखान वर केलेल्या छाप्याच नेतृत्व हे महाराजांनी स्वतः केलं.
सर्वच मंडळी महाराजांना हा विचार किती चुकीच ठरेल हेच सुचवत असणार. परंतु छापा यशस्वी झाला . शाइस्ताखानाची तीन बोट कापली गेली. त्याचे भाग्य थोर म्हणून तो जिवंत सुटला, पण महाराजांच्या धास्तीने दोन दिवसात पुणे सोडून गेला.
महाराज हे भूत, जादुगर, त्यांच्यात गायब होण्याची शक्ती आहे आहे अनेक अफवा उठल्या. महाराजांना जी वचक आणि भय निर्माण करायचं ते पुर्णत्वास गेलं.
एक आदर्श सेनानी आणि नेत्याच उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज सोडून दुसऱ्या कोणाच नाव घेणे उचित होईल असा मला वाटतं नाही.
बहुत काय लिहिणे !
-आदित्य सांगळे (@aditya_s08_)
No comments:
Post a Comment