विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 September 2020

सरदार पाटणकर घराणे

 



सरदार पाटणकर घराणे.
--------------------------------------------------
पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच पाटण वरून त्यांना पाटणकर नाव पडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याच्या सेवेसाठी पिढ्यानपिढ्या मोलाचे योगदान दिले.
सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार सरदार नागोजीराव साळुंखे उर्फ पाटणकर,सरदार ज्योत्याजीराव साळुंखे,सरदार बहिरजीराव साळुंखे या मुळपुरुषांपासुन झालेला आपल्याला पहायला मिळतो. पुढे यांच्याच वंशातील सरदार हिरोजीराव पाटणकर, सरदार चांदजीराव पाटणकर,सरदार हणमंतराव पाटणकर,सरदार रामराव पाटणकर यांनी स्वराज्याची सेवा केली.वंशविस्तारामुळे सरदार पाटणकरांच्या शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, रामपूर,दिवशी बुद्रुक व खुर्द शाखा, सावंतवाडी, सातभाई(भाऊ) पाटणकर शाखा जांभूळवन, मनदुरे, वाजेगाव,ग्वाल्हेर या शाखा उदयास आल्या.
रामपूर शाखा हि ग्वाल्हेरकर सरदार पाटणकरांची पितृशाखा होय.रामपूर शाखेचे मुळपुरुष सरदार हणमंतराव पाटणकर हे सरदार चांदजीराव पाटणकरांचे कनिष्ठ बंधू.चांदजीराव व हणमंतराव हे दोन्हीही बंधु मोठे तलवारबहाद्दर.सरदार चांदजीराव यांनी 1692 मध्ये जिंजी मोहिमेत मोठा पराक्रम गाजवला यावर खुष होऊन छत्रपती राजाराम यांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची सनद दिली.अनेक मोहिमेत व उत्तरेकडील मुलुखांचा बंदोबस्त करण्यासाठी चांदजीराव हे आघाडीवर होते.आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच सरदार हणमंतराव पाटणकर हे आपल्या तलवारीची धार दाखविण्यात मागे नव्हते.सरदार हणमंतराव यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना समशेरबहादूर हा किताब दिला.याच हणमंतरावांनी रामपूर शाखेची स्थापना केली.या ठिकाणी पाटणकरांचा वाडा आहे.रामपूर शाखेला सरदार पाटणकर घराण्याची धाकटी पाती म्हणून ओळखले जाते.याच रामपूर शाखेतील वंशज सरदार मानसिंगराव पाटणकर यांचे पुत्र श्रीमंत सरदार रामचंद्रराव उर्फ आप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या पदरी राहून आपली कर्तबगारी बजावली.
श्रीमंत रामचंद्रराव यांच्या पराक्रम आणि मुत्सद्देगिरीमु
ळे शिंदे सरकारांची त्यांच्यावर विशेष मर्जी संपादन झाली.शिंदे दरबारातील एक बडे प्रस्थ म्हणून सरदार पाटणकरांचा नावलौकिक होता.सरदार पाटणकरांच्या कार्य कर्तृत्वावर खुश होऊन श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे व महाराणी बायजाबाईसाहेब यांच्या कन्या चिमणाबाईराजे साहेब यांचा विवाह श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांच्याशी 1816 मध्ये लावून देण्यात आला.या विवाहानंतर श्रीमंत रामचंद्रराव पाटणकर यांना ग्वाल्हेर संस्थानकडून दरसाल सव्वा लक्ष रुपयांची जहागिरी मिळाली होती.तसेच संस्थानाकडून सरदार पाटणकरांना बरेच मान मरातब प्राप्त झाले. आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी श्रीमंत रामचंद्रराव उर्फ अप्पासाहेब पाटणकर यांनी ग्वाल्हेरमध्येच आपले वास्तव केले.यांच्यापासूनच पुढे ग्वाल्हेरमध्ये सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार झाला.
------------------------------------------------------------
साभार:-
# ग्वाल्हेर_सरदार_घराणी
# सरदार_पाटणकर_घराणे
The Great Maratha-श्रीमंत महादजी शिंदे सरकार
4 shares

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...