भाग ११
पोस्टसांभार :रोहित शिंदे
१२) #नेमाजी_शिंदे -
नेमाजी
शिंदे हे जिंजी च्या वेढ्यात राजाराम महाराजांना मिळाले असा एक
सर्वसामान्य समज आहे, परंतु नेमाजी सुरवातीस शिवकाळात स्वराज्यात होते.
सभासत बखर मध्ये शिलेदारांच्या पागेच्या यादीत त्यांचा उल्लेख आहे. पुढे
शम्भू काळात ते मोगलांकडे गेले असावे. पण वर सांगितल्या प्रमाणे ते पुन्हा
२३ नोव्हेंम्बर १६९० रोजी ते जिंजीस स्वराज्यात आले.
पुढे त्यांचा पराक्रम सर्वश्रुत असल्याने इथे सविस्तर देणे टाळले जात आहे.
परन्तु त्यांच्या काही ठराविक नोंदी पुढील प्रमाणे.
१६९३ मध्ये अल्पकाळा साठी जिंजी चा वेढा उठल्याने ते देशावर आले होते.
नेमाजिंनी आपल्या लष्करी कारकिर्दीत दक्षिणेतील #जिंजी_हैद्राबाद पासून महाराष्ट्रातील #व्हरांड_खानदेश_सोलापूर_नंदूरबार_थाळनेर व #बृहनपूर ते #भोपाळच्या पुढे व #माळव्यात_उजैन_मालोदा_काळबाग_बुंदेलखडतील_सिरोंज पर्यंत यशस्वी मोहिमा काढल्या.
विशेष म्हणजे ह्या सर्व मोहीम त्यांनी दस्तुरखुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत असताना काढल्या.
त्यांनी #व्हरांड व #नंदूरबार येथील #रुस्तमखान व #हुसेनखान ह्या मोघली सुभेदारांना ही लढाईत जीवंत कैद केले होते.
ब्राहपुरीच्या मोघली छावणी वर केलेल्या हल्ल्यात ही त्यांचा समावेश होता.
शिव
काळ पासून शाहू महाराज असे जवळ जवळ पाच छत्रपतींची सेवा करणारा हा काही
मोजक्या सरदारां पैकी एक असा रणांगणावरील जातीवंत मोहरा होता. ह्याच्या
बद्दल #शेवटचा_उल्लेख १७१८ मध्ये खानदेशातील नेमणुकीचा मिळतो .
No comments:
Post a Comment