भाग १२
पोस्टसांभार :रोहित शिंदे
१३) #कर्णाजी_शिंदे -
कर्णाजी शिंदे हे कुडाळचे होते. त्यांनी स्वराज्याच्या एन भरारी च्या दिवसात अनेक महत्त्वाच्या लढाईत भाग घेतला.
कर्णाजी चंदन वनदन व माहुली किल्ल्याचे किल्लेदार होते.
कर्णाजी शिंदे ह्यांचा उल्लेख आपल्याला १७३७ ची वसई ची मोहीम व १७३९ ची त्रिचिरपल्ली येथील ही मोहिमेत येतो.
कर्णाजी शिंदे ह्यांनी १७३७ ते १७३९ ह्या काळात वसई चा किल्ला, केळवे माहीम (महिकावती), केळवे पाणकोट व भुईकोट ह्यास अनेक वेळा वेढा देत, शेवटी जिंकून घेतले. त्या शिवाय ह्या मोहिमेत इतर अनेक घडा मोडीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांनतर पुढे १७३९, मध्ये दक्षिण मोहिमेत त्यांनी त्रिचिरपल्ली किल्ल्या च्या वेढ्यात विलक्षण असा पराक्रम करत किल्ला जिंकून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. व मोहिमेत इतर ठिकाणी ही पराक्रम केला होता.
कर्नाजींनी नाशिक जिल्ल्यातील त्रिलंगवाडी गड व प्रसिद्ध असा हरिषचन्द्र गड अनुक्रमे १७४४ व १७४८ मध्ये जिंकून स्वराज्यात आणला. ह्या बद्दल कर्नाजींना #सोन्याचे_कडे_बक्षीस मिळाले होते.
No comments:
Post a Comment