विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 October 2020

#दख्खन...

 


#दख्खन
...
अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेतील आक्रमना नंतर दक्षिणेतील वैभवशाली संपन्न हिंदु राज्य एका मागून एक संपली. दक्षिणपथात प्रचंड आस, बलाढ्य मराठ्यांच सार्वभोम राज्य "देवगिरी" ही ह्याच मुस्लीम आक्रमणात तोशीस लागली.
देवगिरी पडण्या मागे एकमेव कारण म्हणजे अतिआत्मविश्वस,गलथान पणा आणि आवसानघातकी पणा, ह्या कारणांमुळे देवगिरीच्या यादवांच इ.स १३१२ मध्ये राज्य संपुस्टात आले. पुढे परत १३१५ मध्ये हरपाल देवाने पुन्हा देवगिरी घेतली, त्याच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोकण, कृष्णा आणि भीमेच्या प्रदेशातून दिल्लीची सत्ता झुगारून देण्यात आली, इ.स.
१३१७ मध्ये "देवगिरी" पुन्हा पडली ती कायमचीच...
मुळ केंद्रस्थानी असलेली मराठ्यांच सत्ताकेंद्र नामशेष झाले होते..
तरी ही ह्या काळात स्वातंत्रप्रेमी यादवांचे "मराठा सरदार हे खिलजी आणि पुढे तुघलकांच्या" अधिकाऱ्यां बरोबर झुंजत होते.
तुघलकांचा दक्षिनेतील सरदार अल्लाउद्दीन बहमनी ह्याने बंड करून स्वताची दक्षिणेत स्वातंत्र गादी निर्माण केली तरी ही, नागपूर,चांदा,माहूर,बागलान,कोकण,मावळ हे प्रदेश स्वतंत्र होते.
या काळात यादवांचे मराठा सामंत बागलानचा मानदेव, पाटण,विशालगड भागाचा अधिपती बल्लाळ कोकणातील संगमेश्वरचे राजे,मळखेडचे सरदार, केंभाविचा केंपरस, आणि मुधोळ, जमखंडी, तेरदळ,बागलकोट या प्रांताचा नारायण. गुलबर्ग्याचे किल्लेदार गंधार आणि बोजा ही नावे आढळतात...
ह्यातील कोकणातील संगमेश्वरच्या राजांनी बहमनी सुलतानाचा प्रमुख सेनापती "मलीक उत्तुजार" ह्याची तर इ.स १४५३ मध्ये, त्याच्या सात हजार मोगली तुर्क सैनिकांच्या बरोबर कत्तल उडवली होती..
मावळ भागातील यादवांचा सामंत म्हणून "इसामी" एके ठिकाणी कोंडण्याचा कोळी राजा "नाग नाईक" ह्याचा उल्लेख करतो.
कदाचीत "इसामी जो फतेह–ऊस–सलातीन मध्ये "नाग नाईकाचा" उल्लेख सामंत म्हणून करतो. तो यादव काळात मावळातील डोंगराळ भागातील यादवांची जी लष्करी ठाणी होती. ती किल्यावर होती, त्यावेळी कोंडाणा हा राजगड,तोरणा,तुंग/तिकोना,लोहगड, ह्या किल्याच्या मध्ये प्रमुख किल्ला होता. "नाग नाईक" हा ह्या सर्व किल्या वरील शिबंदीचा प्रमुख असल्यामुळे, तो त्याला यादवांचा सामंत म्हणून उल्लेख करत असावा. हा एक संशोधनाचा भाग आहे....
यादवांच्या काळात लष्करीदृष्ट्या किल्यांच महत्व इतके दिसत नाही.पण..!! भीमाशंकर ते महाबळेश्वरच्या पट्यात लष्करीदृष्ट्या किल्यावरील शिबंदी ही "महादेव कोळी" ह्याच समाजाची दिसते.. एक मात्र नक्की आहे यादवांच्या काळात किल्यावरील लष्करी ठाणी ही "महादेव कोळी" जमातीच्या लोकांच्या कडे होती. ह्या "महादेव कोळी" जमातीच शौर्य बघून पुढे निजामशाहीत "महादेव कोळ्यांची" स्वतंत्र असी लष्करी पथके अस्तित्वात आली होती.इ.स १५८४ मध्ये मोगलांच्या विरुद्ध पुढे जो "मलिक अंबर" ने लढा दिला त्याच्या सुरवातीच्या काळात त्याच्या हिंदु सरदारात "व्यंकटराव कोळी" यांचे नाव आढळते..
थोडक्यात काय देवगिरी पडल्या नंतरच्या काळात मावळ ते कोकण ह्या पट्यात यादवांच्या सामंतांनी तुघलकांच्या नंतरही, बहमनींना जो शेवट पर्यंत जो चिवट आणि तिखट लढा दिला, त्यात मराठ्यांच्या बरोबर महादेव कोळी लोकांच ही मोठ योगदान आहे.
देवगिरी पडल्यावर ही, यादवांच्या पतना नंतर पन्नास साठ वर्ष तरी. माहाराष्ट्रात खिलजी,तुघलक किंवा बहमनी यांची सत्ता स्थीर झाली असे म्हणता येणार नाही.
ह्या काळात दक्षिण कोकणात अनेक लहान मोठे मराठे राजे होते. ह्या सर्वात प्रबळ असा संगमेश्वरचा राजा होता. ह्याची स्वताच आस तीनशे गलबतांच आरमार होते. ह्या संगमेश्वरी अरमरानी कित्येक परदेशी मुस्लिमांची प्रवासी व व्यापारी गलबत लुटली कित्येक मुस्लिमांच्या कत्तली उडवल्या असा नोंदी बहमनी सेनापती "महंमद गावानं" ह्याच्या पत्रातून दिसतात..
तर "फेरीस्ता" हा तीनशे गलबतांचा आधिपतीचा उल्लेख "खेळण्याच्या शंकरराय मोरे" आसल्याचा करतो..
एके ठिकाणी "पगडी" बोलतात
बहमनींना माहाराष्ट्रात शेवटचा प्रतिकार झाला तो कोकण आणि मावळात १४७० चा काळात त्यामुळे माहाराष्ट्राचा इतिहास हा इ.स. १३१२ ते१४७० चा काळ हा प्रतिकाराचा काळ म्हणून समजला जावा..…..🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...