भाग १
पोस्टसांभार :रोहित शिंदे
महाराष्ट्रास इतिहासाचा प्राचीन वारसा आहे, महाराष्ट्राच्या ज्ञात राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा सातवाहन काळ (इ.स.पूर्व २५०) पर्यंत जातात.
तेव्हा पासुण ते अगदी शिवकाळ व पुढे म्हराठा साम्राज्याची इतिश्री होऊन भारत देश स्वातंत्र्य होईपर्यंत अनेक महाराष्ट्र तील पुरुषांनी शात्र धर्माची पराकाष्टा केली. व आपल्या कुळाचे घराण्याचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले.त्यातीलच एक प्राचीन व गौरवशाली वारसा लाभलेले कुळ म्हणजे शिंदे कुळ.
शिंदे कुळ हे महाराष्ट्राच्या प्राचीन कुळांपैकीच एक आहे. आज महाराष्ट्रातील बरेच कुळांचे मूळ सबंध हे इतिहासातील राजपुताना व मध्यभारतातून दक्षिणेत संकट काळात स्थालनंतरीत झालेल्या वीर पुरुषांशी जोडले गेले आहेत. परंतू शिंदे कुळ हे महाराष्ट्रातील च आद्य कुळ आहे.
शिंदे कुळाचा अनेक प्राचीन उल्लेख हा चालुक्यसबंधी इतिहासाची पाने वाचल्यास सापडतो. चालुक्य काळात शिंदे कुळ हे सेन्द्रक नावाने ओळखले जात. चालुक्य व कदंब ह्या प्राचीन कुळांशी शिंद्यांचे विवाह सम्बन्ध चे उल्लेख ही मिळतात.
तर अशा ह्या प्राचीन शिंदे कुळातील काही वीर पुरुषांचे इतिहासाच्या पानातील उल्लेख आपण पाहूया.
सुरवात
१) [बाळाजी_शिंदे]
बाळाजी शिंदे हा पुरुष १२ व्या शतकात होऊंन गेला. हा पैठण च्या भौम राजाच्या पदरी असलेला एक बऱ्यापैकी समकालीन विख्यात तलवार बहाद्दर होता.
इ.स.११४० मध्ये अहिलवडा // अहिलंपट्टणम च्या चौलुक्य चा मंडलिक असलेल्या चंपानेर चा गोवर्धन बिंब राजा चा लहान भाऊ प्रताप बिंब राजा जो शिलहारांच्या ताब्यातील ऊत्तर कोकण जिंकण्यास निघाला होता. त्याच्या मदतीस पैठण च्या राजाने स्वतःचे दोन हजार सेंन्य हे बाळाजी शिंदेंच्या नेतृत्वात दिले होते.
ह्या सेण्याचा मदतीने बिंब राजाने शिलहारांच्या ताब्यात असलेला समूळ उत्तर कोकण चा प्रदेश जिंकून घेतला होता.(ह्यात मुंबई चा प्रवाही टापू, थेट वाळकेशवर पर्यंत चा प्रदेश ही होता)ह्या लढाईत प्रताप बिंब राजास बाळाजी शिंदे चे विशेष सहायय झाले होते.
पुढे ह्या बाळा जी बरोबर आलेले इतर शिंदे पुरुष(त्याचा वनश किंवा नातेवाईक) उत्तर कोकणात च वसल्याचे कळते.ह्यांच्याकडे आत्ताच्या मुंबई प्रांत (पूर्वीचे साष्ठी) मधील मालाड येथील [#एरगळ_ची_पाटीलकी]होती. इ.स.१२१२ व इ.स. १२२४ युद्धात त्यांनी पराकर्म केले. त्याचा उल्लेख खालील पोवाड्यात येतो
परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. [#सिंद्याचा_जमाव_थोर_झाला](
नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'
No comments:
Post a Comment