~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोणत्याही
राज्याच्या सुखनैव कारभाराला जबाबदार ही तिथली सज्जड न्यायव्यवस्था असते.
थोरल्या शाहूंनी शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु असलेली परखड आणि
निरपेक्ष न्यायव्यवस्था अगदी जशीच्या तशी पुढे सुरु ठेवली.
एखाद्या
गुन्ह्याची न्यायालयीन प्रक्रिया हा काही मनमानी कारभार त्यांनी कधीच होऊ
दिला नाही. ग्रामपंचायतीपासून सुरु झालेली न्यायप्रकिया वेळ पडली तर
न्यायपालिकेचं अग्र असलेल्या राजापर्यंतही जायची. न्यायाधीश हा
न्यायपालिकेचा एकमेव मुख्याधिकारी जरी असला तरी फार कमी न्यायालयीन
प्रक्रियेमध्ये एकटा न्यायाधीश निर्णय द्यायचा. तळातल्या सर्वात कमी
हुद्द्याच्या अधिकाऱ्यांपासून राजापर्यंत जवळ जवळ सगळे या न्यायव्यस्थेचे
भागीदार असायचे. गुन्ह्याच्या सर्व घटनाक्रमाची तपासणी करणं- फिर्यादी आणि
गुन्हेगार यांची बाजू ऐकणं- प्रत्यक्षदशी पुराव्यांची पडताळणी करणं हे सगळं
रीतसर व्हायचं आणि त्यावर राजाने नेमलेल्या न्यायाधीशांचा पॅनेल निर्णय
देत असे.
६ ऑक्टोबर १७१८
साली साताऱ्यात एक न्यायालयीन प्रक्रिया चालली त्यात न्यायाधीश म्हणून
सामील असलेल्या असामींची यादी उपलब्ध आहे. ती यादी पुढे देतोय. यावरून
मराठा साम्राज्यात न्यायदान हा एककल्ली कारभार नसून ती सर्वसमावेशक
समाजाभिमुख प्रक्रिया होती हे दिसून येतं.
_________________
_________________
६ ऑक्टोबर १७१८ साली साताऱ्यात एक न्यायालयीन प्रक्रियेत सामील न्यायाधीशांची यादी.
१) मुधळभट पंडितराव
२) फत्तेसिंह भोसले
३) श्रीनिवास परशराम पंतप्रतिनिधी
४) बाळाजी विश्वनाथ भट, प्रधान
५) बालाजी वासुदेव, अमात्य
६) नारो शंकर, सचिव
७) कान्होजी आंग्रे, सरखेल
८) महादजी गदाधर, डबीर
९) सेखो विठ्ठल, न्यायाधीश
१०) नारो प्रह्लाद, छंदोगामात्य
११) नारो राम, वाकनीस
१२) यादव गोपाळ
१३) कान्होजी अनंत सेनाकर्ते
१४) गोविंद रायाजी ( भुईंजकर जाधवराव )
१५) आनंदराव रघुनाथ
१६) पंताजी शिवदेव
१७) मोरे मल्हारी(?), बक्षी
१८) खंडो बल्लाळ
१९) शंकराजी मल्हार
२०) खंडेराव दाभाडे, सेनापती
२१) सुल्तानजी निंबाळकर, सरलष्कर
२२) मुधोजी नाईक निंबाळकर
२३) मानसिंग मोरे
२४) सिधोजी निंबाळकर
२५) कृष्णाजी प्रतापराव मोरे
२६) केरोजी पवार
२७) दावलजी सोमवंशी
२८) पिलाजी जाधवराव
२९) संताजी कदम
३०) धर्मोजी देवकाते
३१) रुस्तुमराव जाधव
३२) मकाजी हटकरराव
३३) रघुजी कदमबांडे
३४) काळोजी भोसले
३५) शेख मीरा
३६) संताजी धायबर
३७) मिया शाही(?)
३८) हुसेन बेग
३९) नीर anudi (?)
४०) लाल मोहम्मद
४१) त्रिंबक माणकेश्वर
४२) संताजी पांढरे
४३) निरोजी सोनलकर
४४) मुहम्मद आदिल
४५) कान्होजी भोसले
४६) इमाम शेख पटेल
या
यादीत अगदी खालच्या हुद्द्यापासून वरच्या हुद्द्यापर्यंतची सगळी माणसं
न्यायाधीश किंवा न्यायदानाचे मुख्य अंग म्हणून नेमलेली आहेत. यांच्यावर
थोरल्या शाहूंचे नाव आहे राजा म्हणून.
मराठा न्यायमंडळाचा हा विस्तार पाहून थोरल्या शाहूंच्या काळात न्यायदान किती महत्वाचं अंग होतं हे समजून येतं.
( ऑगस्ट २८- १७२२ च्या अश्याच एका न्यायालयीन प्रक्रियेत शंभरावर नावं उपलब्ध आहेत. )
Post By: बोम्बल्या फकीर
No comments:
Post a Comment