मराठा इतिहासातील हा घटक इतका महत्वाचा आहे की त्याचा विचार राज्य रक्षण, विस्तार आणि देशभर त्या बळावर निर्माण केलेले वर्चस्व यादृष्टीने त्याकडे इतिहास म्हणून तटस्थ पणे पाहिले व लिहिले पाहिजे.पण प्रत्येक घटकांकडे जातीय दृष्टिकोनातून पाहण्याची वाईट प्रथा पडत चालली आहे.
गनिमी कावा छत्रपतींनी अवलंबिला, शत्रूची युद्धनीती अभ्यासली आणि त्याच पद्धतीने त्यांच्यावर मात केली. त्याकाळी त्याची गरजच होती. म्हणून स्वराज्य निर्माण झाले.मोडेन पण वाकणार नाही, सूर्यास्त झाला की युद्ध थांबवणे या धर्म युद्ध पद्धतीचा अवलंब केला असता तर ते घडले नसते, याचे अनेक दाखले शिवरायांनी दिले आहेत.
त्याप्रमाणे 18 व्या शतकात महादजी शिंदे सरकार यांनी निर्माण केलेली कवायती फौज ही त्यांची दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा आणि अवलंबिलेली एक नवी युद्ध पद्धत होती. शिवरायांनी जशी परकीय आक्रमक मुस्लिम यांचा अभ्यास केला तसाच महादजींनी परकीय इंग्रजांचा अभ्यास केला. त्यांनी ओळखले की तशीच फौज, तशीच युद्ध पद्धत, तशीच नीती, तशीच शस्त्रे व तशीच शिस्त असल्याशिवाय त्यांच्यापुढे निभाव लागणार नाही आणि त्यामागे लागले, करून दाखविले. त्यासाठी पाण्यासारखा पैसे खर्च केला.
इंग्रजांचे आगमन म्हणजे सर्व दृष्टीने या देशात आलेली नवं विचारांची लाट होती आणि त्यामुळे नवा विरुद्ध जुना असा संघर्ष सुरू झाला. त्याना त्यांच्या पद्धतीनेच रोखता येईल हे महादजींनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी कवायती फौज उभारली म्हनजे काय
केले तर डीबॉयन याची प्रशिक्षणासाठी नेमणूक केली त्याला 10000 पगार व जहागीर दिली.त्याने दहा हजारांची एक अशा अनेक पलटणी तयार केल्या.त्याना युद्धाचे, शिस्तीचे प्रशिक्षण दिले इतके की युद्धात पराभव दिसू लागलाच तर शिस्तीत माघार कशी घ्यायची तेही शिकविले व त्याचे प्रत्यनतर लालसोतच्या युद्धात आले, ते दुसरे पानिपत होते त्यावर महादजी मत करू शकले ते या शिस्तीमुळे होय अन्यथा 1761 च्या पानिपत युद्धात प्रचंड संहार झाला तो या व अशा अभावामुळे मग सहकाऱ्याना मरणाच्या दाढेत सोडून पळून आलेले वाचले.
कवायती फौजेचाच एक भाग म्हणजे आधुनिक शस्त्रे, महादजींनी तोफा, दारुगोळा, बंदुका इतकेच नव्हे तर अग्निबाण बनविण्याचे कारखाने सुरू केले आणि आपल्या प्रशिक्षित सैन्याकरवी त्याचा विजयी वापर केला. पूर्ण तयारी करूनच इंग्रज या नवं लाटेला नष्ट करायचे हे त्यांचे ध्येयच होते. लष्करी तयारी बरोबर सर्व लहानमोठ्या भारतीय सत्ताना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालले होते.
त्याना आणखी आयुष्य लाभते तर त्यांनी ते करून दाखविले असते असे अनुमान काढायला खूप वाव आहे.इतिहासकार म्हणतात हा देश इंग्रजांनी जिंकला नसता तर फ्रेंच्यानी जिंकला असता हे किती कटू सत्य आहे. पण श्रीमंत महादजींनी हा धोका ओळखून त्याचा बंदोबस्त सुरू केला होता. त्यांचे निधन झाले आणि इंग्रजांच्या मार्गातील अडथळा दूर झाला. असे अनेक लेखक लिहितात, जोवर महादजी व नाना होते तोवर मराठा सत्तेकडे पाहण्याची कोणाची छाती नव्हती. कोणतीही पद्धत यशस्वी करण्यासाठी सक्षम नेतृत्व लागते. महादजीच्या पश्चयत कवायती फैज निष्प्रभ झाली त्याला इतरही करणे होती.
No comments:
Post a Comment