(तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिराचे कळस, तुम्ही नसता तर राहिले नसते तीर्थक्षेत्र, धर्मरक्षिता अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार मुजरा )
उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे आजोळ त्यांचे आजोळ चे आडनाव मैंदाड.
आपल्या आजोळी त्यांनी पापनाश मंदिराची पूर्णबांधणी करून सुंदर अशा मंदिरांचा समूह निमार्ण केला.
बालाघाटाच्या डोंगर-दऱ्यात असंख्य शिवमंदिरे आपणास पाहावयास मिळतात त्यातील कित्येक मंदिराभोवती विहिरी, सभामंडप , मंदिरे अहिल्याबाई यांनी उभे केले तर काहींना देणग्या, अन्न छत्र उभे केले.
त्यातीलच आपल्या आजोळी असणारे मंदिर त्यांनी नव्याने उभारले तेथे लंन्गर सुरु केला.
या मंदिराला भेट द्या तुम्हाला येथील शांत व सुंदर वातावरणाची भुरळ पडेल अत्यंत निरव शांतता व नैसर्गिक देणगी लाभलेला हा भाग व सोबतीला पापनाश मंदिर समूह व तेथील शिल्प, बारव व प्रसन्नता अनुभवण्यासारखी आहे.
चोराखळी गाव हे उस्मानाबाद-बीड हायवे वर असून गावातून पुढे गेल्या नंतर बालाघाटाच्या रांगेतील दरीत वसले आहे श्री.पापनाश मंदिर. मुख्य मंदिराला आतून ओवऱ्या व त्याला बाहेरून वाड्यासारखा कोट आहे.
मंदिरात जाताना उजव्या बाजूला श्री विष्णूची स्थानक समपाद उभी मुर्ती असून बाजूला श्री हनुमनाचे छोटेखानी मंदिर आहे.
मंदिराच्या आतील भागात तीन बाजूने ओवऱ्या असून त्यात भक्त व साधू संत आज ही वास्तव्यास असतात काही विना वादक कायमचे वास्तव्य करत असल्याचे जाणवले , महादेवाच्या समोर सुंदर रंगकाम केलेला नंदी असून नव्याने दुसरा नागफणी असलेला नंदी देखील बसवला आहे. त्याच बाजूला त्रिशूल व ध्यान जागा आहे.
मंदिरावर गजशिल्प, मोर, त्रिशूल, स्वस्तिक, नागशिल्प, स्त्री दाम्पत्य शिल्प असून.
मंदिराच्या मागील बाजूने पुष्कर्णी कडे जाण्यासाठी छोटेखानी दरवाजा आहे येथील पुष्कर्णी मध्ये मध्यभागी सुंदर असे मंदिर असून जवळील भागात साधू पुरुषांच्या समाध्या, सभागृह, वीरगळ, भैरव, पाच फूट उंचीच्या नागफणा असलेले नागशिल्प, शिवपिंडी, सतीशिळा इ. मुर्ती आपणास या मंदिर समूहात पाहावयास मिळतात.
या पुष्कर्णीला खेटून एक कुंड असून वरील पाजरणारे व पडणारे पाणी या कुंडातून मुख्य पुष्कर्णी मध्ये येण्यासाठी गोमुख हि ठेवण्यात आले आहे या पाण्यात कासव, मासे व इतर पाण्यातील प्राणी स्पष्ट दिसतात.
या मंदिरसमूहाच्या बाजुला आलेल्या भक्तांसाठी लंगर हि आहेत.
देवाची रोज नित्य पूजा केली जाते श्रावणात भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात भरते.
जामखेड तालुक्यातील चौंडी या गावचे पाटील श्री. माणकोजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी सुशीला देवी ह्यांच्या घरी अहिल्यादेवी यांचा जन्म झाला.
संपूर्ण भारतात वेगवेगळ्या काळात प्राचीन मंदीरे यांची स्थिती खूप विदारक होती काही नष्ट करण्यात आले होते तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर होते यांची पुन्हा नव्याने स्थापना व बांधणी अहिल्याबाई यांनी केली नदीवर घाट बांधले, यात्रेकरू साठी धर्मशाळा बांधल्या, पाण्यासाठी विहिरी निर्माण केल्या अशी एक विहिर तुळजापूर मध्ये कमानवेस येथे आहे. ज्या काळात राजे महाराजे स्वतःसाठी महाल बांधत होते त्या काळात अहिल्याबाई होळकर या तीर्थक्षेत्र जे कि धर्माचा आत्मा व स्वाभिमान असतो ते टिकवण्याचे काम करत होत्या म्हणूनच
त्यांच्या या देवकार्यामुळे अखंड भारत त्यांचा ऋणी राहील. त्यांचे आजोळ असलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरखाळी हे गाव स्मारकाच्या रूपाने पुढे यायला हवे त्या भागात देखील अहिल्याबाई होळकर यांनी शिवमंदिरे ( पापनाश) बांधल्याचा उल्लेख मिळतो.
पानिपत मधील जखमींची सुश्रुषा, दवापाणी , अन्न छत्र , emergency मेडिकल कॅम्प इंदोर येथे उभा करून त्यांनी खूप जनांना आधार दिला खूप जनांचे प्राण वाचवले.
त्यांना स्तुती केलेली अजिबात आवडत नसे त्यांनी त्यांच्या बद्दल केलेल्या स्तुतीच्या वह्या नदी मध्ये फेकून दिलेल्या नोंदी इतिहासात आढळतात.
स्त्रियांची लष्करी फौज अहिल्यादेवी यांनी उभारली होती त्यांचे गुप्तहेर खाते जबरदस्त होते त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत होती व महसूल व्यवस्था व ताळेबंदातील बारीक सारीक चुका त्या एका क्षणात पकडत.
त्यांच्या आयुष्यात त्यांनी जवळपासची किती तरी माणसे सरणावर चढताना पहिली त्यात सासरे, नवरा, मुलगा, सुना इ. त्या जशा मयाळू , श्रद्धाळू होत्या तशा कणखर व जशास तसे उत्तर देणाऱ्या निर्भीड होत्या म्हणून आज दोनशे वर्ष होऊन गेले तरी संपूर्ण भारतात त्यांची थोरवी व पाऊलखुणा आज ही पाहिला मिळतात. त्यांच्या समकालीन लोकांनी , इतिहासकारांनी त्यांच्या बद्दल गौरव उदगार काढलेले दिसून येतात. त्यात
स्कॉटलंडमध्ये कवयित्री जोना बेली यांनी लोकमाता अहिल्यादेवींवर एक दीर्घ काव्य लिहिले आहे. त्यात अहिल्याबाईच्या अंगभूत गुणांचे यथायोग्य वर्णन केले आहे.
For thirty years her region of peace,
The land in blessing did increase !
And she was blessed by every thongue...
By stern and gente, old and young!
याचे भाषांतर हिरालाल शर्मा यांच्या पुस्तकात केलेले आहे. ते खालील प्रमाणे-
तीस वरुषे प्रशांत सत्ता त्यांनी गाजवली|
वैभव, धन, ऐश्वर्य संपदा, सदैव वाढविली ||
सुष्ट, दुष्ट अन सान थोर त्या साऱ्या पौरजनांनी |
मुक्त रवाने सती अहिल्या सदैव वानियली ||
इतिहासकार आणि त्याकाळचे पोलिटिकल एजंट सर जॉन मालकम म्हणतात, ‛ अहिल्याबाई हि एक असामान्य स्त्री आहे. दुराभिमानाचा त्यांना स्पर्शही नाही. धर्मपारायणही असलेली ही स्त्री कमालीची सहनशील आहे. त्यांचे मन रुढीप्रिय असले तरी, रूढींचा उपयोग जनकल्याणासाठी करून घ्यायची त्यांची हातोटी विलक्षण आहे. प्रत्येक क्षणाला सदसद विवेक बुद्धीने कर्तव्य करणारे ते उच्च प्रतीचे जीवन आहे. त्यांच्या चरित्राचा विकास केवळ अद्वितीय असाच आहे.
त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड एलनबरो यांनी एका पत्रात म्हंटले आहे की, “ अहिल्याबाई एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि आदर्श राज्यकर्त्या आहेत. अन्य धर्मियांचा द्वेष त्यांच्या ध्यानीमनीसुद्धा नाही. एका महाराज्याच्या स्वामीनी असूनही त्या तपस्वीप्रमाणे अगदी साध्या राहतात. शुभ्रवस्त्राखेरीज अन्य वस्त्रे त्यांना त्याज्य आहेत.”
शाहीर प्रभाकर आपल्या कवनात म्हणतात,
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई |
गेली कीर्ती करुनिया भूमंडळाचे ठाई ||
महाराज अहिल्याबाई पुण्यप्राणी |
संपूर्ण स्त्रियांमधि श्रेष्ठ रत्नखाणी ||
असे गौरवउदगार व लेख त्यांच्या बद्दल अनेकांनी लिहून ठेवले आहे यातून त्यांची थोरवी आपल्याला कळून येते.
मराठेशाहीतील धर्मरक्षिता, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिर्थास आवश्य भेट द्या व येथील ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी आपल्या इतिहास व पुरातत्व परिषद, उस्मानाबाद जिल्हा यास आवश्य संपर्क करा
7020928941
9765296869
- जयराज खोचरे
अध्यक्ष
इतिहास व पुरातत्व परिषद , उस्मानाबाद जिल्हा.
No comments:
Post a Comment