भाग ९
पोस्टसांभार :रोहित शिंदे
९) #संताजी_शिळिंमकर (शिंदे)
संताजी
शिळिंबीकर हे गुंजन मावळातील पिढीजात वतनदार होते. त्यांचे शिळीमकर हे
घराणे मूळचे सतारा मधील वाई प्रांतातील श्री लिंब ह्या तीर्थ क्षेत्र
ठिकाणचे.
गुंजन मावळात आल्यावर पूर्वीच्या वास्तव्याचे ठिकाण श्रीलिंब वरून व पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शिळीमकर हे उपणाम कायम झाले.
ह्या
घराण्याकडे निजामशाही काळात राजगड ची (भोरप्याचा डोंगर,मुरुम्ब देवाचा
डोंगर, शहामृग गड) किल्लेदारी होती. पुढे नंतर वनशवाढीने ह्या कुटुंबाचे
तीन घरात रूपांतर झाले व ह्याची वाटणीचे शिवकाळातील कागद आजही उपलब्ध आहेत.
ह्यांच्या वाटण्यात शहाजी महाराज, रनदौलाखान, मोरोपंत पेशवे ह्यांनी
निवाडे दिले आहेत.
ह्या
घरणयाने जवळीच्या लढाईत, प्रतापगड चालढाईत व सिंहगड च्या छाप्यात सक्रिय
सहभाग घेतला होता. रायरीचा डोंगर (रायगड) हा ह्याच घराण्यातील पुरुषांनी
मोर्यांकडून ताब्यात घेतला होता.
पुढे संताजी हे द्वितीय शिवाजी महाराज (राजाराम महाराज पुत्र) ह्यांच्या काळात #राजगड_वर_सुवेळा_माचीचे_तटसरनौबत
होते. औरंगजेब बादशाहने राजगडावर आक्रमण केले त्या वेळेस संताजी शिळिंबकर
प्रनोप्रणाने झुंजले. व २० डिसेंबर १७०३ रोजी सुवेळा माचीवरील बिनी
बुरुजावर समोरील धमधम्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा स्वतःच्या छातीवर झेलून
धारातीर्थी पडले.
सुवेळा माचीवर गणेश शिल्पाच्या उजविकडे तटबंदीला लागून च त्यांची #वीरगळ आजही तिथे आहे.
No comments:
Post a Comment