विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 October 2020

★★★ शहाजी महाराज ★★★

 


★★★ शहाजी महाराज  ★★★
________________________________________________
(हे संकलन "वेध महामानवाचा" या कादंबरीतुन केले आहे. मी माझ्या मनाने कोणताही काळ किंवा सनावाळ बदलली नाही त्यामुळे प्लिज वाद घालू नका).
सन 1600 : शहाजी महाराजांचा जन्म.
सन 1602 : शरीफजी महाराजांचा जन्म.
सन 1605 : मालोजीराजे यांचा मृत्यु याच काळात बादशहा अकबरचाही मृत्यु.
सन 1608 ते 1615 : बादशाह जहांगीर (सलीम)याने निज़ामशाही नष्ठ करण्यासाठी युद्ध चालू ठेवले.
सन 1623 : संभाजीराजे (शिवाजी महाराजांचे मोठे बंधू) यांचा जन्म.
सन 1624 : मुघल आणि अदिलशहा यांनी संयुक्तपने निज़ामशाही नष्ठ करण्यासाठी मोहीम आखली, आणि नगरजवळ भातवडी येथे मोठे युद्ध झाले यात मालिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाहीने मोघल-अदिलशहा यांचा दारुण पराभव, याच लढाईत शहाजीराजांचा मोठा पराक्रम आणि ते नावरूपाला आले.
सन 1625 (अखेर) किवा 1626 (सुरवात) : शाहजीराजांनी निज़ामशाही सोडली. कारण होते मलिक अंबरशी मतभेद.
आणि आदिलशाही धरली.
सन 1627 : जहाँगीर बादशहा, मालिक अंबर आणि इब्राहिम अदिलशहा यांचा मृत्यु. दक्षिणेत राजकारण बदलले याच वेळी शाहजीराजांनी आदिलशाही सोडली आणि पुन्हा निज़ामशाही धरली.पण फत्ते खनाच्या कर्तुत्वशून्यतेमुळे अंतर्गत राजकारण वाढले आणि याच काळात 25 जुलै 1629 रोजी लखोजी जाधवराव यांचा त्यांच्या 4 मुलांसह निज़ामशाही दरबारात खून केला गेला.
या घटनेमुळे शहाजीराजांवर काय परिणाम झाला यावर इतिहास तोंड बंद करुण बसला आहे कदाचित या घटनेमुळे शाहजीराजांना अस्थिरता आणि सुरक्षा यांचा धोका जानवला असणार आणि त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे स्वप्न रुजले गेले असावे.
मोघल आणि अदिलशहा यांनी निज़ामशाही विरुद्ध मोहीम सुरु केली होती याचा फायदा घेत शहाजीराजांनी पुणे व् सुपे जी त्यांची जहागीरी होती ती स्वतंत्र राज्य म्हणुन घोषित केले यावर अदिलशहाने मुरार जगदेव यास पुण्यावर पाठवले आणि पूर्ण प्रांत निस्तानाबूत केला आणि 1629 (अखेर) पुण्यावर गाढ़वाचा नांगर फिरवला. शाहजीराजे सावध झाले आणि मोघलांकड़ रुजू झाले.
याच काळात शाहजीराजे यांचे चुलत भाऊ खेळोजीराजे भोसले यांच्या पत्नीला गोदावरी नदीवर आंघोळ करत असताना मोघल सरदार महाबतखान याने पळवून नेले.
मोघलांकडून लढताना शहाजीराजांनी मुरार जगदेव आणि रणदुल्ला खान या आदिलशाही सरदारांशी मैत्री वाढवली.
सन 1631-32 च्या सुमारास मोघलाई सोडून पुन्हा निजामशाहीत रुजू. काही महिन्यात दौलताबादला वेढा आणि हुसेन निजामशहा आणि वजीर फत्तेखानला अटक. निज़ामशाही संपली.
सन 1633 : शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावरून मुर्तजा निजामशहाला सोडवले आणि पुन्हा निज़ामशाही स्थापन केली आणि स्वता वजीर बनले.
मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान यांच्या मदतीने अदिलशहाशी युती करुण मुघलांविरुद्ध उभे केले. यांच्याच मदतीने निजामशाहीचे जिंकलेले भाग अदिलशहाकडून परत मिळवले.1633 ते 35 हा काळ शाहजीराजांसाठी चांगला होता मुर्तुजाला मांडीवर बसवून स्वता निज़ामशाही चालवली. राजांच्या ताब्यात असलेला मुलुख 51 लाख होन इतका होता. (1 होन म्हणजे आजचे 10 ग्राम सोने).
शाहजीराजांच्या देखरेखीखाली मुरार जगदेव याची नांगरगाव येथे सुवर्णतुला करण्यात आली आणि नांगरगावचे नाव बदलून तुळापुर करण्यात आले.
सन 1635 (अखेर) : अदिलशहाचा वजीर खवासखानचा खून, मुरार जगदेवाचाही खून आणि शाहजीराजांचा कट्टर दुश्मन मुस्तफाखान अदिलशहाचा वजीर झाला.
मुस्तफाखानाने निजामाशी असलेली युती तोडली आणि मुघलांशी हात जुळवनी केली.
शाहजीराजांना असलेला आदिलशाहचा पाठिंबा संपला आणि त्यांच्या फौजा राजांचा पाठलाग करू लागल्या.
राजे माहुली किल्ल्यावर असताना वेढा पड़ला, रणदुल्लाखान या आपल्या मित्रामार्फत शाहजीराजांनी तहाची बोलनी केली आणि राजे शरण आले.
याचबरोबर निज़ामशाही नष्ठ झाली आणि शहाजीमहाराजांचे स्वतंत्र राज्याचे स्वपनही संपूष्ठ पावले.
(वरील संकलन "वेध महामानवाचा" या कादंबरीतुन केले आहे).
धन्यवाद.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...