छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण -
२५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही
आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही, रयतेनी ही झाडे लावून लेकरासारखी बहुतकाळ जतन करून वाढवली त्यांचे दुखास पारावार काय ? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे " छत्रपती शिवरायांनी आपल्या आरमार उभारणी करताना सुद्धा रयतेची घेतलेली काळजी आणि नैसर्गिक समतोल या आज्ञापत्रातून दिसतो..
मराठा आरमार छोटे असले तरी मराठा लष्करी व्यवस्थेतील ते एक प्रमुख अंग होते. समकालीन साधनांवरून असे दिसून येते कि मराठा आरमारात लहान मोठी अशी विविध जातीची जहाजे होती. गुराबा, शिबार्डे, पगार अशी हि जहाजे होती..
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हलचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
या दोन मुख्य नौकाशिवाय शिवाड, तरांडी, तारू, माचवा, पारव, जुग, फ्रिनेट अशा अनेक प्रकारच्या जहाजा मराठा आरमारामध्ये सामील होत्या,सभासदकार हा मराठा आरमारातील जहाजांची एकूण संख्या ७०० देतो परंतु अंदाजे ६४० नौका मराठा आरमारात असाव्यात ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना आणि जलदुर्ग बांधणी केल्यानंतर त्याचा फायदा हा स्वराज्यासाठी होऊ लागला. कोकण किनार्यावरील प्रदेशाचे सिद्दी, पोर्तुगीज यांच्या आक्रमणापासून संरक्षण होऊ लागले. तसेच त्या काळात समुद्रात फुटून किनार्यास आलेल्या जहाजावर मराठयांना मालकी हक्क सांगता येऊ लागला. आरमार निर्मितीमुळे पायदळ, घोडदळ यांना आरमाराचे साहाय्य होऊ लागले अन्नधान्याची रसद पोहचवणे सोपे झाले ( उदा - बसनूर आणि सुरत मोहीम ). कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी जहाज बांधणी उद्योगाचा पाया रचला गेला शिवाय अनेक लोकांना यातून रोजगार आणि आरमारात नोकऱ्या मिळू लागल्या होत्या. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या परकीय सत्तांवर आपला वचक बसला तो वेगळाच...
छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती.मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच
आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..
आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..
No comments:
Post a Comment