मुळशीतील सौंदर्यरत्ने
नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे कोलाड रोड वरील पौड गावाच्या २किमी अलीकडे दारवली या गावातील सरदार नावजी बलकवडे यांचे पुत्र होनाजी नावजी बलकवडे यांचा वाडा पाहणार आहोत या वाड्याचे अवशेष आजही आपल्याला बलकवडे घराण्यातील पराक्रमाची साक्ष देत मोठ्या दिमाखात उभे आहेत
गावाच्या माध्यभागी ३०ते४० फूट उंचीवर हा वाडा ६"एकर मध्ये पसरला आहे वाड्याचे पश्चिमेकडील भव्य प्रवेशद्वार त्याच्या वैभवाचा दिमाख दाखवत भक्कम पायांवर उभे आहे या प्रवेशद्वाराची उंची २० ते २२ फूट असून काळ्या पाषाणातील त्याचे बांधकाम २५० वर्षांनंतरही टिकून आहे प्रवेशद्वारावरील कमळाचे सुंदर शिल्प व दरवाजा वरील गणेश पट्टी स्पष्टपणे दिसून येते ग्राममुख असलेला हा दरवाजा मुळा नदीच्या काठावर वसलेल्या दारवली गाव नजरेसमोर उभा करतो दरवाज्याच्या दोन्ही बाजूसदगडी तटबंदीचे अवशेष नजरेत पडतात दोन्ही बाजूस घडीव जोत्यांच्या देवड्याआजही संरक्षकांच्या स्थानाची ओळख करून देतात दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या ओवऱ्या असुन तेथून पुढे वाड्याच्या मुख्य प्रांगणात आपण जातो आणि पडीक अवस्थेतील भव्य चोपसी वाड्याचे चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्व बाजूस असल्याचे त्याच्या एकंदर रचनेवरून समजते त्याचे तोंड पुण्याकडे असल्याने त्याला पुणे दरवाजा असे म्हणत असत हा वाडा पंचराखणी चोसोपी तिघई दुपाखी म्हणजे १८० खानाचा व दोन्हीं बाजूस ओवरीयुक्त असा भव्य होता वाड्याची लांबी व रुंदी १५०× १५० फुटांची असून त्याच्या भिंती आजही काही प्रमाणात आपल्याला दिसतात पाच साडेपाच फुटांच्या भक्कम चौथर्यावर हा वाडा दीमाखाने उभा असावा असे वाटते वाड्याच्या चौकात कारंजे असल्याच्या खुणाही दिसतात हा प्रदेश पावसाचा असल्याने चौकातील पाणी बाहेर काढण्यासाठी बंदिस्त गटारे काढण्यात आली होती वाड्याला दक्षिणेकडे एक दरवाजा होता वाड्याच्या भोवताली फिरल्यावर घोटीव पाषाणातील ताटबंदी पाहून आपण आश्चर्यचकीत होतो पश्चिम दिशेला वाड्याच्या जवळच पाणीपुरवठ्यासाठी एक घोटीव विहीर बांधलेली आपल्याला दिसते मुख्य चौथर्याजवळ आल्यावर या वाड्याचे निर्माते सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या समाधीस आपण मुजरा करतो होणाजी बलकवडे यांनी निर्माण केलेले कालभैरवनाथ व विठ्ठल मंदिर आजही सुस्थितीत असून मंदिरासमोर अनेक वीरगळ बलकवडे घरांन्यातील वीरांच्या पराक्रमांचे साक्षीदार बनून उभे आहेत आता जाणून घेऊयात वाड्याच्या इतिहासाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात नावारूपाला आलेले सरदार नावजी लाखमाजी बलकवडे नावजी बलकवडे हे शंकरजी नारायण यांच्या पायदळात सप्तसहस्त्री या पदावर होते त्यांनी सिंहगड जिंकून देण्याचे कबुल केले त्या बदल्यात त्यांना कोळवण खोऱ्यातील सावरगाव इनाम म्हणून देण्याचे ठरले ३०जून १६९३ रोजी नावाजी बलकवडे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सारखा दोर व शिड्यांच्या साहाय्याने गड जिंकून घेतला व सिंहगडा वर भगवा फडकवला पुढे नावजी बलकवडे यांनी कोरीगड, लोहगड, सुधागड हे किल्ला देखील स्वराज्यात आणले या बद्दल त्यांना छत्रपती राजाराम महाराज यांनी दारवली व मुलखेड ही गावे इनाम म्हणून त्यांना दिली पुढील काळात त्यांचे पुत्र सुभेदार होनाजी बलकवडे, सुभेदार येसाजी, किल्लेदार पिलाजी हे या वाड्यात वास्तव्यात होते त्यानेही पुढे चांगला पराक्रम केला थोरले बाजीराव पेशवे यांच्या सोबत तसेच त्याचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या सोबत जंजरेकर सिद्धी च्या विरुद्ध तसेच गुजरात मोहीमेत सुरत परगण्यातील घनदेवी हा प्रांत जिंकून घेतला व वसईच्या मोहिमेत देखील मोठ्या हीरीरीने सहभाग घेतला होता मराठेशाहीच्या इतिहासात बलकवडे घराणे व दारावली गावचे नाव अजरामर झाले आज मितीला दारवली गावात वाड्याच्या समोरच सरदार नावजी लाखमाजी बलकवडे याचे स्मारक मोठ्या दिमाखात उभे आहे मुळशीतील सौंदर्यरत्नेच्या मुळशीतील सरदार या भागात आपण बलकवडे सरदार यांची माहीती घेणारच आहोत . जेष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे हे याच गावचे सुपुत्र आहेत
धन्यवाद
आकाश मारणे
टीम मुळशी

No comments:
Post a Comment