विजयदुर्गचे रहस्य.
वाघोटन खाडीच्या तोंडावर एका भूशिराच्या टोकावर पूर्वापार एक किल्ला होता. त्यच नाव घेरीया. कदाचीत जवळच्या गिर्ये गावावरून ते रूढ झाल असेल. पुढे १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयनाम संवत्सारात शिवाजीराजांनी हा किल्ला जिंकला. मूळचा किल्ला पाडून टाकला आणि त्याच जागेवर एकात एक तीन तटबंद्या असणारा एक नवा बलाढ्य किनारी किल्ला उभारला.
भारतीय नौदलाच्या मुंबईतील नौदल संग्रहालयाचे अभिरक्षक(क्युरेटर) असणा-या कमांडर ए.व्ही. गुपचूप यांनी त्यांना लिब्सन येथे आढळलेल्या एका एतिहासीक कागदपत्राच्या आधारे एक नवीनच गोष्ट शोधून काढली. कदाचीत शिवरायांच्या सागरी दुर्गबांधणीचा तो परमोच्च आविष्कार असला पाहिजे.
विजयदुर्ग किल्ल्यापासून दिडदोनशे मीटर अंतरावर सुमारे पाऊण कि.मी. लांबीची, तीन मीटर रूंदीची आणि समुद्रतळाच्या उंच - सखलतेप्रमाणे एक भक्कम भिंत समुद्रात बांधलेली आहे. ओहोटीच्या वेळीही ती भिंत पाण्याच्या पातळीवर डोकावत नाही.
या भिंतीची निर्मिती तीनशे वर्षांपूर्वी म्हणजे शिवकालातच झाली आहे, असा तज्ञांचा निर्वाळा आहे. या भिंतीला इंग्रज आरमाराच्या तीन युध्दनौकांचे तळ धडकावल्याने त्या युध्दनौका फुटल्या व विजयदुर्गवरील परचक्र टळले. आजही भर समुद्रात असं बांधकाम करण खूप अवघड मानलं जात. तीनशे वर्षापुर्वी कोणत तंत्र वापरून समुद्रीपाण्याच्या खाली असं बांधकाम केल असेल, याची कल्पनाच करवत नाही.
कमांडर ए.व्ही. गुपचूप यांना पोर्तुगालची राजधानी असणा-या लिब्सन शहरातील पुराभिलेखागार म्हणजे अर्काइव्हजमध्ये एक कागद सापडला. तो मोडी लीपीत आणि मराठी भाषेत होता. त्याच वाचन करण तिकडे कोणाला जमेना. पण त्या कागदाची प्रतिरूपमुद्रीत म्हणजे काजळ प्रत इकडे आल्यावर, त्याच्या वाचनातून एक अनोखी हकीकत समजली. हा वृत्तांत त्या घटनेत सहभागी असणा-या एका व्यक्तीने गोव्याच्या विजरईला (व्हाईसरॉय) याच पत्राद्वारे कळवला होता
....मुंबईहून तीन युध्दनौकांसह निघालेले कंपनी सरकारचे सैन्य पुरेश्या तयारीनीशी विजयदुर्ग किल्ला जिंकण्यासाठी निघाले होते. बहुदा अमावस्येच्या आसपास असणा-या मिट्ट काळोख्या रात्री ही मंडळी विजयदुर्गाजवळ येताच एकदम डावीकडे वळून, विजयदुर्गच्या जवळात जवळ जायच; तेथूनच किल्ल्यावर तोफांचा भडिमार करायचा आणि किल्ला मिळवायचा, असा त्यांचा मनसुबा होता.
पण प्रत्यक्षात घडल भलतच! किल्ल्याच्या जवळ जाण्याअगोदर वेगात असलेली पहिली युध्दनौका अचानक पाण्यात बुडाली. दुस-या युध्दनौकेची तीच गत झाली. तिस-या युध्दनौकेवरील जागरूक चालकांनी युध्दनौकेचा वेग खूप कमी केला. पण तीही युध्दनौका समुद्रस्तुप्यतु झाली. पण तोवर जहाजावरील अनेकांना पाण्यात उड्या मारून आपापला जीव वाचवला होता. त्यांपैकीच एक व्यक्तीनं ही हकिगत पत्राद्वारे गोव्यात कळवण्यासाठी नोंदवून ठेवली होती.
मराठी होड्या -गलबत-मचवे आणि युध्दनौका यांचे तळ उथळ व सपाट असल्याने, त्यांना ऐन समुद्रात बांधलेल्या पण भरती - ओहोटीच्या वेळी पाण्याखाली दडून राहणा-या ह्या गुप्त संरक्षक भिंतीवरून सहज ये-जा करता येत होती. त्यामुळे इथे असं काहीतरी असेंल याची शंकाही कोणाला कधीही आली नव्हती.
पण परदेशी मंडळींच्या जहाजांचे तळ खूप खोलवर जाणारे निमुळते असत. मुळातच वेगाने जाऊन - आश्चर्याचा धक्का देत हल्ला करणाचा विचार असल्याने, ह्या खोलवर जाणा-या निमुळत्या बुडाचा धक्का पाण्याच्या पातळी खालील जाडजूड दगडी भिंतीला बसला. त्यामुळे ती जहाजे फुटली. असं काही असण्याची पुर्व कल्पना त्यांना असती, तर त्यांनी त्या युध्दनौका अलीकडेच थांबवून तोफांचा जोरदार मारा केला असता.
ह्या भिंतीची निर्मीती शिवकाळातच झाली असावी, असा साधार तर्क गोव्यातील एन.आय.ओ म्हणजे नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी किंवा राष्ट्रीय सागर संशोधन संस्थेतील तज्ञ अभ्यासकांनी केला. त्यांच्या अशा निर्वाळ्यामुळेच नौदलाच्या संग्रहालयातील अभ्यासकांनी हे श्रेय श्रीशिवछत्रपतींच्या कल्पक दूरदृष्टीला दिले.
मिलिंद गुणाजी यांच्या डिस्कव्हर महाराष्ट्र या कार्यक्रमात हि लिंक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा., रविवार निमित्त हा व्हिडीओ आपल्यासाठी खास पर्वणीचं ठरू शकतो
No comments:
Post a Comment