विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 November 2020

सेनाखासखेल

 सेनाखासखेल हे पद मराठा साम्राज्यातील एक महत्वाचे पद होते. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हे पद अस्तित्वात आले. सेनापतीच्या खालोखाल 'सेनाखासखेल' हे पद असते. सेनाखासखेल अर्थात उपसेनापती. इंग्रजीत सेनाखासखेल पदाची ' A leader of sovereign tribe' अशी व्याख्या आहे. या पदाच्या व्यक्तिला फौज बाळगण्याचा अधिकार असतो. या पदाच्या व्यक्तिला त्याच्या पदरी असलेल्या फौजेच्या खर्चासाठी राजाकडून फौज सरंजाम अर्थात काही प्रदेश जहागीर म्हणून दिला जातो. त्या जहागीरीचा कारभार सेनाखासखेल चालवतो व त्याच्या पदरी असलेल्या फौजेचा पगार तो जहागीरीतून मिळालेल्या करातून करतो. या पदाच्या व्यक्तिला युद्धकाळात राजाच्या आदेशावरुन त्याच्या पदरी असलेली फौज युद्धासाठी आणावी लागते. हे पद किताब म्हणूनही एखाद्या घराण्याला दिले जाते.

पद प्राप्ते[संपादन]

  • सेनाखासखेल

    दमाजी गायकवाड
  • सेनाखासखेल यशवंतराव थोरात
  • सेनाखासखेल त्रिंबकराव दाभाडे
  • सेनाखासखेल संभाजीराव शिंदे

संदर्भ[संपादन]

No comments:

Post a Comment

फलटण संस्थान

  फलटण संस्थान फलटण  हे सातारा  जिल्ह्यातील    एक  तालुका व  शहर  आहे.  फलटण  शब्दाची उत्पत्ती  फल   उत्तन  ( अर्थात  फळबागांचा  प्रदेश ) अश...