विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 November 2020

यशवंतराव थोरात

 


यशवंतराव थोरात
 (१६८८-१७१९) हे कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होते. छत्रपती संभाजींनी त्यांच्या शौर्यासाठी त्यांना 'सेनाखासखेल' हे पद बहाल केले. यशवंतराव थोरात हे वारणा खो-यातले एक पिढीजात वतनदार होते. छत्रपती संभाजींनी त्यांना विजापूर प्रांतात जहागीर दिली होती. त्यांनी आष्टा या ठाण्याला आपल्या कामकाजाचे मुख्यालय बनवले. १७१७-१७१९सालच्या दरम्यान त्यांनी विजापूर प्रांत आपल्या अधिकाराखाली आणला. जून १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवा यांच्या विरुद्ध लढताना‌ पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झालेल्या लढाईत त्यांना वीरमरण आले. इतिहासात ती लढाई 'आप्टीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...