स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसलेःवेरूळ
छञपती शिवरायांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ हे गाव आहे.
शिवरायांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांचा जन्म वेरूळ येथे झाला.
त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे हे दोन पुञ म्हणजे शिवरायांचे आजोबा या दोघांचाही जन्म वेरूळला झाला.
मालोजीराजे यांना दोन पुञ झाले.ते म्हणजे शहाजीराजे भोसले हे शिवरायांचे वडिल व शरीफजीराजे भोसले हे शिवरायांचे चुलते होय.या दोघांचाही जन्म वेरूळमध्येच झाला.
मालोजीराजे व विठोजीराजे यांच्या या दोन्ही कुटूंबाला राहण्यासाठी वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर बावीस खोल्यांचा एक (गढी )वाडा बांधला होता.तो आता जमीनदोस्त झाला आहे.त्या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत.या वाड्याच्या मातीला व परिसराला या सर्वांचे चरण लागले आहेत.
गढीचे काही अवशेष फक्त नावालाच राहिलेे आहेत.जे काही शिल्लक आहेत,त्याची खूप दुर्दशा आहे. त्या वाड्यात मोठ मोठे असे वाढलेले गवत आहे.त्या गढी समोर छञपती शिवरायांचे वडिल शहाजीराजे यांचे स्मारक असून त्या ठिकाणी भव्य असा शहाजीराजांचा एक मोठा पुतळा उभा केला आहे.त्या पुतळ्याची रचना भव्य असली तरी त्या पुतळ्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.कारण त्या पुतळ्याचा रंग निघून चालला आहे.तसेच
पुतळ्याला आधार म्हणून बसवलेली फरशी कधी निघून पडेल काहीच सांगता येत नाही.
गढीत जसे मोठ मोठे गवत आहे.तसेच शहाजीराजे यांच्या स्मारकाच्या परिसरात असेच गवत आले आहे.हा सर्व परिसर गवताने खूप वेढला आहे.गवतात मोठ मोठे साप सुध्दा दिसतात.बर्याच ठिकाणी बिळे व वारुळे अशी ही भयान अवस्था वाड्याची झालेली आहे.
शहाजीराजे भोसले व माॅंसाहेब जिजाऊ यांचा विवाह देवगिरी किल्ल्यासमोर झाला.त्यानंतर माॅंसाहेब जिजाऊ काही वर्षे त्या गढीमध्ये थांबल्या होत्या.ही वेरूळमधील पविञ माती मनाला आनंद,उर्जा नेहमी देऊन जाते.
इ.स१५९५मध्ये हे घृष्णेश्वराचे मंदिर एकदम ढासळले होते.ते ढासळलेले मंदिर छञपती शिवरायांचे आजोबा मालौजीराजे यांनी स्वःखर्चाने बांधले त्याला नवे रूप दिले.
वेरुळमध्ये असणार्या भोसले घराण्यातील समाध्या...
घृष्णेश्वर मंदिराच्या समोर एक समाधी व मागील बाजूस दोन, अशा एकूण तीन समाध्या आहेत.या तीन समाध्या पैकी
बाबाजीराजे भोसले,मालोजीराजे भोसले,विठोजीराजे भोसले यांच्या आहेत.
———————————————————————
{आश्चर्यकारक विहीर व तलाव}
त्याच समाधीच्या अगदी समोरील शेतात रहस्यमय एक विहीर आहे.विहीर किती खोलवर आहे याचा अंदाज येत नाही.या विहीरीत पश्चिमेकडून एक भुयारासारखा मोठा गुप्त मार्ग आहे.तो गुप्त मार्ग बहुतेक मालोजीराजे भोसले यांच्या वाड्यातून म्हणजेच गढीतून येत असावा......किंवा मालोजीराजे व विठोजीराजे भोसले यांनी बांधलेल्या 133 एकर तलावातून येत असावा. हा तलाव चंद्राकृती असून मध्यभागी एक बेटासारखी टेकडी 60 ते 70 फूट उंचीची व 300 ते 350 फूट व्यास असलेली आहे.
एवढे मोठे वैभव आहे.ते जपले पाहिजे.
9881295961





No comments:
Post a Comment