आप्टीची लढाई
कोल्हापूर-सातारा गादीचे युद्ध ह्या युद्धाचा भाग
|
दिनांक |
|
|
स्थान |
|
|
परिणती |
पेशवा बाळाजींचा विजय परंतु
कुल्हापूरकर राज्यावरचे संकट टळले. |
|
युद्धमान पक्ष |
|
|
सेनापती |
|
|
यशवंतराव थोरात (कोल्हापूर गादी) |
बाळाजी विश्वनाथ(सातारा गादी) |
आप्टीची लढाई जून १७१९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झाली. ही लढाई पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्यात झाली. या लढाईत यशवंतरावांचा पराभव झाला आणि त्यातच
त्यांना वीरमरण आले. परंतु कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राज्यावरील संकट टळले
आष्ट्याचे
ठाणे
त्यावेळेस
वारणा खो-याचा प्रदेश हा सातारा व कोल्हापूर राज्याच्या सीमेलगतचा महत्त्वाचा
प्रदेश होता. आष्ट्याचे ठाणे हे वारणा खो-यातील मुख्य ठिकाण होते, म्हणून बाळाजींनी
आष्ट्याच्या ठाण्यावर हल्ला करण्याचे योजिले. त्यावेळेस वारणा खो-याचा प्रदेश आणि
आष्ट्याचे ठाणे हे कोल्हापूरकर छत्रपतींच्या मंत्रीमंडळातील सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्या ताब्यात होते. तेव्हा यशवंतराव विजापूर प्रांतात
मोहीमेवर होते. त्यांना बाळाजींच्या हल्ल्याची माहिती समजताच ते स्वतःच्या
सैन्यासहीत आष्ट्याच्या ठाण्यात आले. बाळाजींच्या हल्ल्याची बातमी कोल्हापूरकर
छत्रपतींना कळवण्यासाठी काही सैन्य आष्ट्याच्या ठाण्यात ठेऊन यशवंतरावांनी पन्हाळा किल्ल्याकडे
कूच केली. बाळाजींनी आणि पिलाजींनी आष्ट्याच्या ठाण्याला वेढा घातला. काही दिवसातच
आष्ट्याचे ठाणे काबीज झाले. त्यामुळे वारणा खो-यायतल्या प्रदेशावरचा कोल्हापूरकर
छत्रपतींचा ताबा संपला.
लढाई
लढाईचे
परिणाम
आप्टीची
लढाई झाल्यानंतरही
बाळाजींनी पन्हाळा किल्ल्याला
वेढा घातला. परंतु लढाईत झालेल्या हानीमुळे बाळाजींना माघार घ्यावी लागली. अर्थात
यशवंतरावांमुळे कोल्हापूरच्या छत्रपतींवर आलेले मोठे संकट टळले, पण यशवंतरावांसारखा शूर
लढवय्या कोल्हापूरकर छत्रपतींना गमवावा लागला ही मोठी हानी झाली.
संदर्भसंपादन करा
·
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड
तिसरा (१७००-१७६०) – वि. का. राजवाडे, संदर्भ क्र.१.
aa आप्टी हे पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव आहे. या गावात सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांची समाधी आहे. या गावात १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्यातली प्रसिद्ध लढाई झाली. ती लढाई 'आप्टीची लढाई' म्हणून ओळखली जाते. या लढाईत उदाजी चव्हाण यांनी यशवंतरावांना धोक्याने मारले असे सांगितले जाते.
आप्टी गावातील सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांचे समाधिस्थळ
सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांच्या समाधमंदिरातील त्यांची व त्यांच्या सती गेलेल्या पत्नी गोडाबाई यांची पाषाणाची मूर्ती


No comments:
Post a Comment