विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 December 2020

नानासाहेब पेशवे यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांनी 'पेशवे' हे पद का काढून घेतले होते?

 


नानासाहेब पेशवे यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांनी 'पेशवे' हे पद का काढून घेतले होते?
------------------------------
नानासाहेब पेशवे हे मराठा साम्राज्य वर असलेले कर्ज कमी करू शकले नाही म्हणून शाहू महाराज नाराज होते.
१७४७ मध्ये नानासाहेब पेशवे कर्नाटक च मोहिमेत गुंतले असताना सातारा दरबार मध्ये शाहू महाराजांचे अनेक दरबारी यांनी शाहू महाराजांचे कान भरायला चालू केले त्यात पेशव्यांचे प्रतिनिधी बाबुराव नाईक बारामतीकर , नागपूरचे रघुजी भोसले, श्रीपत राव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी दाभाडे , गायकवाड इत्यादी अनेक मंत्री यात सामील होते.या सततच्या कटकटी ल वैतागून शाहू महाराजांनी ९ मार्च १७४७ ला "शिक्के कट्यार आणि जरी पटका पुढे पाठवून जामदार खान्यात जमा करावे "असा नानासाहेब यांना शाहू महाराजांनी निरोप धडला.
शाहू महाराजांना या दरबार मंत्री चा कट कळाला नाही असा नाही छत्रपती शाहू माहाराज हे अत्यंत कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने राज्यकारभार पहाणारे व हाकणारे राजकारणी होते. वारसा नसलेले शाहू महाराज राज्याची पुढील सोय काय हा प्रश्न त्यांना कायम होता. नानासाहेबांना दिनांक ९ मार्च १७४७ रोजी पेशवापदावरून दूर करून छत्रपती शाहू माहाराजांनी एक प्रकारे नानासाहेब यांची परिक्षाच घेतली .
. या दरबारी मंत्राचा अंदाज होता की १)नानासाहेब पेशवे बंड करतील . २) किंवा नानासाहेब पेशवे क्षमायाचना मागतील आणि शाहू महाराजांच्या पायावर लोळण घेतील . पण अस काहीच घडले नाही.
नानासाहेबांनी सुद्धा मुत्सद्दी प्रमाणे "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा सांगणे, आज्ञा होऊन पायांचा वियोग न व्हावा.." अशी अर्जदास्त नानासाहेब यांनी छत्रपती शाहू माहाराज यांजपाशी केली.
घोळ एक महिना चालला . पेशवे पदास दुसरा कोणता लायक उमेदवार मिळाला नाही त्यामुळे १३एप्रिल ल पुन्हा शाहू महाराजांनी नानासाहेब पेशवे यांना पेशवे पद दिले.
शाहू माहाराजांनी नानासाहेब यांची योग्यता, विश्वासार्हता पून्हा एकदा राजमंडळासमोर आणून सर्वांस कृतीतून गप्प करून नानासाहेबांस परत पेशवा पदावर नियुक्त केले. छत्रपती शाहू माहाराजांनी अखेच्या काळात म्हणजेच सन १७४९ मधे पुढील राज्यकारभार करण्यासाठी वंशचालेस्तोवर पेशवा पद चालविण्यासाठी सनद करून दिली. पेशव्यांना मर्यादित अधिकार दिले. असे असले तरी राजमंडळाचे अधिकारही कायम ठेवले.
तरीसुद्धा शाहू महाराज हे दरबारी मंत्री कटला कसे काय बळी पडले हा प्रश्न राहतोच . शेजवलकर यांनी नानासाहेब पेशवे यांच्या विषयी लिहून ठेवलेले इथे मांडणे संयुक्तिक ठरेल.
शेजवलकर म्हणतात …
जसे जसे मराठे भारतात हिंङू लागले तेव्हां शिवाजीराजांच्या वेळचा आदर्शवाद जाऊन अर्थकारण कारभारात शिरले. मोठ्या राजपूत आणि मुघलांची अमीर-उमरावांची जिवनशैली बघू लागले. हळूहळू चैन अंगी भिनू लागली.त्यामुळे अर्थकारणात स्वार्थ आला. छत्रपती शाहू,बाजीराव व नानासाहेब ही परिस्थिती बदलण्यास असमर्थ ठरले.
नानासाहेब फार लवकर आयुष्यात आरामी बनले.त्यामुळे पुणे न सोङता बसल्या जागेवरुन कारभार चालवण्याचा कल झाला.नंतर हा प्रकार वाढीस लागला .
बाजीराव व त्याने निर्माण केलेले सरदार ह्यांमध्ये मालक-नोकर असे संबध नसुन,जास्त मैत्रीचे संबंध असंत.त्यामुळे बाजीराव-चिमाजीअप्पा ह्यांची मुले म्हणून नानासाहेब,राघोबा व सदाशिवरावभाऊ ह्यांबद्दल प्रेम असले तरी वचक नव्हंता.नानासाहेबांचा कल तर असा होता की कोणत्याही प्रकारे शिंदे होळकर ह्यांनी उत्तर भारतातून पैसा आणून गादीला झालेले कर्ज फेडावे. शाहू महाराजांनी जवळच्या सल्लागारांच्या सल्यावरून त्यांनी नानासाहेबांचे पेशवेपद काढून घेतले होते. पण महिन्याभरात इतर लोकांची लायकी कळून ते त्यांनी सन्मानाने नानांना परत केले.आपल्या म्रुत्यू समयी तर त्यांनी पेशव्यांना सर्वाधिकार दिले. हा मुद्दा तर सहज काढता येतो की असलेल्या लोकांत राज्य गाडा हाकण्यांस पेशव्यांहून लायक मराठी माणूस छत्रपतींना सापडला नाहीं.
संदर्भ:
पानिपत १७६१-त्र्यं.शं.शेजवलकर,
पेशवाई कौस्तुभ कस्तुरे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...