वसईचा किल्ला
मुंबई वर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यर्थ गेला. त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली. इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी मोहिमेची सूत्रे हाती घेतली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला केला. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ’हर हर महादेवाच्या’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. जबरदस्त लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे कामी आली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. इथल्या लढाईनंतर मराठ्यांनी किल्ल्यातील सर्व घंटा काढून नेल्या व आपापल्या इष्ट देवतांना अर्पण केल्या.
चर्चचे प्रवेशद्वार, वसई किल्ला |
१२ डिसेंबर १७८० रोजी किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला.
हल्ल्यात उडाले लोक । करिती किती शोक ॥
पडूनी संग्रामी । नव लाख बांगडी फुटली वसई मुक्कामी ।।
वसई युद्धाचे काही समकालीन उल्लेख
1. यामागे युद्धे बहुत जाली परंतु या लढाईस जोडाच नाही - चिमाजी आप्पा
2. वसईचा प्रसंग म्हणावा तरी हस्तगत होईल ऐसा भरवसा कोणासही नव्हता.. स्वामींचा निश्चय थोर तन्मुळेच वसई फत्ते.... सरदार अमृतराव शंकर
3. ऐसे कर्म मागेही कोणास न जाले, अथवा पुढेही न होणार, ऐसी गोष्टी स्वामीच्या हातून जाली - त्रिंबक हरी पटवर्धन
4. वसई फत्ते जाली, संस्थानच प्राप्त झाले, राज्येच एक सुटले, एैसा यत्न या राज्यात कोण्ही केला नाही - चिंचवडकर नोंदवही
5. दक्षिणची फौज मऊ लागली म्हणजे बेजरब घेणार, कठीण लागले म्हणजे फिरोन पाहणे नाही, ऐसी पूर्वापार या राज्यातली तऱ्हा
6. फिरंगी याचा जागा वसई जाहलियामुळे समुद्रात सर्वास दहशत प्राप्त होऊन चौर्यांशी बंदरातीरी महाराजाची सलाबत गालिब जाहली.
समुद्राकडील प्रवेशद्वार, वसई किल्ला |
सोबत व्यंकटेश ताम्हणकर |
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गोव्याच्या गव्हर्नरचे पोर्तुगालच्या राजाला लिहिलेले पत्र
हे पत्र आहे १६ ऑगस्ट १६५९ रोजीचे :-
"आदिलशहाचा बंडखोर सरदार शहाजी याच्या मुलाने चौल व वसई जवळचा प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ असल्यामुळे व सर्व कोकणचा मालक असल्याने आम्हाला अधिक सावध राहणे भाग पडले आहे. तसेच त्याने कल्याण व पनवेल या वसईच्या मुलखात अनेक युद्धनौका बांधल्या आहेत. त्यांना समुद्रात येऊ देऊ नये असे आदेश वसईच्या कप्तान ला दिले आहेत."
No comments:
Post a Comment