विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

सरदार चव्हाण (झाल्टॆ)

 





सरदार चव्हाण (झाल्टॆ)
*महाराष्ट्र जि. बुलढाणा ता. चिखली पो.अंबाशी मु. रानअंत्री (जुने नाव राजअंत्री) येथील वाडा*
हे गांव देवगीरी वरुन आल्यानंतर सरदार चव्हाण (वंशज नंतर झाल्टॆ झालॆ) व त्यांचे पुत्र जयसिंगजी ,मानसिंगजी व सखारामजी यांनी वसवलॆ .त्यावेळी त्यांच्या सोबत बलुतेदार सुद्धा आले .गावच्या मधोमध भव्य असा वाडा व बाजुला बाकीचे लोकं ,गोठा अशी रचना.
वाड्याच्या विटा ज्या शेतात तयार केल्या त्या शेताला आजही भट्टी हे नाव आहे.वाड्यामधे पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाण्याकरीता छोटी विहीर (आड) आहे.आजही त्यातील पाणी स्वच्छ असुन वापरतात.वाडा किल्ल्यासारखा असुन त्याला दोन बुरुज आणी दोन दरवाजे आहेत .दरवाजे बंद केल्यानंतर आत प्रवेश अशक्य असे.साधारणत:१९७०-८० च्या दशकात जेव्हा चोर यायचे त्यावेळी रात्री गावातील सर्व स्त्रीया,मुले वाड्यात सुरक्षीत रहायचे तर पुरुष मंडळी वाड्याभोवती सर्व बाजुने पहारा करायचे.
कालपरत्वे आता वाडा पडायला झाला .त्याचे काही वंशज (चव्हाण–झाल्टॆ) वाडा सोडुन गेले,काहींनी आपल्या हिस्स्याच्या वाड्याला कुलूप लावले तर काही अजुनही तेथे रहातात .
या वाड्याने कित्येक सुख दु:खाचे क्षण पाहीले ,उत्साहाने झालेली लग्न पाहीले.श्री गुरु परमानंद नारायन सरस्वती महाराज (संजीवन समाधी १९१०) यांचा वावर , त्यांना साक्षात पहाण्याचे भाग्य या वाड्याला लागले .
आता वाडा थकलाय पडायला झालाय
कालाय तस्मै नम:!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...