हैदराबादच्या निजामाच्या इ सन १७२७ सालच्या एका पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे, " Previously I(Nizam) had written to shahu (छत्रपती थोरले शाहु महाराज) to prevent the Marathas (his sardars) from crossing the river Narmada. He did not listen to my warnings.This is due to his pride and ignorance. He is responsible for many improper deeds. His followers (sardars) too have behaved in an improper manner. In spite of my prohibition,the Maratha armies have crossed the river Narmada and spread in the province of Malwa." या निजामाच्या पत्रात छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या बद्दल निजामाविरोधातील कणखर बाणा व भुमिका तसेच मराठा सरदारांवरील पकड स्पष्ट होत असताना इतिहासकार गो स सरदेसाई यांनी त्यांच्या रियासतीत छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या बद्दल जे चुकीचे व विनाधार मत मांडले आहे ते साफ चुकीचे असुन तो छत्रपती थोरले शाहु महाराज यांचा व त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान केला हेच सिद्ध होते !!!
गो स सरदेसाई हे त्यांच्या रियासतीत म्हणतात," छत्रपती शाहु महाराज हे निजामधार्जिणे व मोगल धार्जिणे होते व ते निजामाविरोधी बोटचेपे धोरण आखत असत." रीयासतकारांच्या या वाक्याचे खंडणच खुद्द हैदराबादच्या निजामाच्या पत्रातील सदरील मजकुर करत आहे हे दिसुन येतो. या पत्रात खुद्द निजाम म्हणत आहे, शाहु माझे ऐकत नाही व त्यांच्या अशा वागण्यामुळेच माझे पुर्ण मनसुबे व करार ध्वस्त झाले आहेत व मी विरोध केलेला असताना शाहुंचे सरदार माळव्यात पसरले आहेत. या पत्रामुळे रियासतकार सरदेसाई यांचेच मनसुबे ध्वस्त झालेले दिसुन येत आहेत !!!
- साभार. राजेनरेश जाधवराव .
No comments:
Post a Comment