देशाच्या सीमा , सांस्कृतिक एकता आणि नागरिकांचे बंधुत्व हे तीन राष्ट्रवादाचे स्तंभ आहेत . आणि मराठयांचे स्वराज्य याच तीन स्तंभावर उभे होते . पुराव्यादाखल खालील पत्र पहा -
.
————————————————————
तारीख - 1-7-1792
" अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्र पावेतो हिंदूंचे स्थान - तुरुकस्थान नव्हे - हे आपली हद्द पांडवांपासून विक्रमादित्यापर्यंत होती . त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले . यवनांचे प्राबल्य आले . ...
त्यानंतर कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते व धर्म राखते निघाले .. हल्ली श्रीमंताचे पुण्यप्रतापेकरून राजश्री पाटील बावांचे ( महादजी शिंदे यांचे ) बुद्धी व तलवारीच्या पराक्रमेकडून सर्व (राज्य ) घरास आले . अगर मुसलमान कोणी असे केले , तरी मोठे मोठे तवारीखनामे ( जाहिरातबाजी )आले असते . यवनाच्या जातीत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनाबरोबर (तुलना ) करून शोभवावी ; आमचे हिंदूत गगना इतकी झाली असता उच्चार न करावा हे चाल आहे ...
( महादजी शिंदेमुळे ) अलभ्य गोष्टी घडल्या . उग्याच दौलती पुसत घरास आल्या ...यवनांचे मनांत की काफरशाही जाली हे बोलतात . लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची त्यांची मस्तके पाटीलबाबानी फोडली ....
या उपरी हे जमाव व या फौजा "लाहोरच्या" मैदानात असाव्यात , त्यांचे मनसुबे दौडावे , वेत्यास पडावे , तमाशे पहावे ...."
.
तारीख - 1-7-1792
.
————————————————————
गेली शेकडो वर्ष मराठ्याच्या मनातल्या हिंदुस्थानच्या राष्ट्र वादाच्या व्याख्या अगदी सुस्पष्ट आहेत .
- डॉ अभिराम दीक्षित
( शेअर करायला परवानगीची आवश्यकता नाही )
No comments:
Post a Comment