निरानरसिंहपूर हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा आहे.
येथील श्री नरसिंह मंदिरात महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश येथील पर्यटक नेहमी दर्शनासाठी येतात.
तसेच या क्षेत्राला शास्त्रीय महत्व देखील आहे.असे म्हणजे शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले कि निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत.हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे.जे अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात.
तसे खूप पुरावे आहेत कि या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे.पूर्वी पासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे.येथे असा पुरावा आहे कि पूर्वी प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून पूर्ण केली. त्यांनी हि यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरु केली होती.हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे.
प्रचंड घंटा
देवालयाच्या पश्चिम दरवाज्याकडे प्रल्हाद मंदिराच्या पाठीमागे वाजविण्याची जी प्रचंड घंटा बांधलेली आहे(जी सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्या कारणाने बाजूला काढून ठेवण्यात आली आहे जी आपणास खलील फोटो मध्ये दिसेल ).ती श्री लक्ष्मी नरसिंह संनादिनी म्हनुन ओळखली जाते.ही घंटा वसई येथील पोर्तुगीज चर्च मधील प्रार्थनेसाठी वापरल्या जात होत्या. इ.स. १७३९ साली पुण्याचे पेशवे चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर त्या लुटून पुण्यास आणल्या.श्रीमंत पेशवे यांनी या घंटा निरनिराळ्या देवस्थानाला पाठवून दिल्या.त्यापैकीच एक सदाशिव माणकेश्वर यांच्या प्रयत्नाने निरा नरसिंहपूर येथे आणण्यात आली. बाबा नावाचा पैलवान याच काळात होऊन गेला.देवालयाचा माडीजवळ याचा पुतळा असुन मोठ मोठी झाडी तो सहज उपटीत असे.वरील प्रचंड घंटा याने डाव्या हाताने पेलून उजव्या हाताने बांधली आशी आख्यायिका आहे.
मंदिरा शेजारी सरदार विंचूरकर यांचा वाडा ही पाहण्या सारखा आहे जो सध्या पूर्ण मोडकळीस आला आहे .
- धीरज सूर्यवंशी
No comments:
Post a Comment