विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

*सरनोबत माणकोजी दहातोंडे *

 



*सरनोबत माणकोजी दहातोंडे *🚩🚩🚩🚩🚩
*१६४२ मधे बंगळूरहून पुण्याकडे जाताना शिवाजीमहाराजांबरोबर माणकोजी दहातोंडे यांना सरनौबत म्हणून, सामराज नीळकंठ यास पेशवा म्हणून ,बाळकृष्ण हणमंते यांना मुझुमदार म्हणून, रघुनाथ बल्लाळास सबनीस म्हणून, तर सोनोपंतास डबीर म्हणून पाठवले होते. या प्रधान मंडळाचे रूपांतर पुढे अष्टप्रधान मंडळात झाले .अशा प्रकारचे प्रधानमंडळ सैन्य,खजिना, ध्वजमुद्रा अशा जय्यत तयारीनिशी शहाजीराजांनी शिवाजीराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली होती.*
*एक प्रकारे शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारी राज्यकारभाराची चौकटच निर्माण करून, त्यांच्याबरोबर पाठवली होती. जिजाऊ जेव्हा कंपिलीत आल्या तेव्हा त्यांच्यासोबत अवघा पंचवीस-तीस लोकांचा सरंजाम होता. मात्र चार वर्षांनी पुण्यात परतताना जिजाऊसोबत होता पूरक असा शहाजीराजांनी दिलेला सरंजाम. कारभारासाठी एखादा महालष्करी सरंजाम देखील पुरेसा होता;पण शहाजीराजांनी अवघ्या 36 गावाच्या कारभारासाठी जिजाऊंच्या मदतीला पेशवे, मुजुमदार ,डबीर ,सबनीस आणि कारकून असे मंत्रिमंडळच पाठवले होते .
शहाजीराजांनी जिजाऊंना केवळ मंत्रिमंडळच दिले नाही तर त्यांच्या हाती त्यांनी स्वतंत्र राजमुद्रादेखील सोपविली होती. शिवबांच्या भावी आयुष्यात ती वापरली जाणार होती. संस्कृतमध्ये ह्या राजमुद्रेवर लिहिले होते. प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषा | मुद्रा भद्राय राजते || याचा अर्थ असा होतो. "प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंद्य असणारी ही शहाजीपुत्र शिवाची मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसत आहे "*
साभार संतोषजी दहातोंडे
*सरसेनापती माणकोजी दहातोंडे प्रतिष्ठान, चांदा
तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर*
🚩🚩🚩⚔️⚔️🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...