विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

मराठ्यांचे इराकमधील शौर्यस्थळ ...


 

मराठ्यांचे इराकमधील शौर्यस्थळ ...
१०० वर्षांपूर्वी मराठ्यांच्या पराक्रमाने गाजलेल्या शौर्य स्थळ.. आपले दुर्दैव किती ते, आपण आपल्याला या हुतात्म्यांबद्दल अधिक माहिती नाही पण इराकमध्ये १०० वर्षांनी सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण सप्ताह पाळला जातो.
खालील फोटोंमधील स्थळ हे बसरा, इराक़ येथे पहिल्या महायुध्दातील वीरांचे स्मारक आहे. ज्यात सगळ्यात जास्त भारतीय सैनिक होते ब्रिटीशासोबत ज्यांनी इराक येथील हि अवघड मोहीम पार पाडली. ११ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर १९१४ या दरम्यान झालेल्या या युद्धात इरकामधील बसरा येथील तेलखाणींचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटीश सैन्यातील एक भारतीय तुकडी तैनात करण्यात आली. फाओहून बसराकडे कुच करत असताना आॅटोमन म्हणजेच टर्किश साम्राज्याचे सैन्याने चिखलाची भिंत तयार करुन ब्रिटीश तुकडीवर हल्ले सुरु केले पण ते अनियोजित असल्याने ब्रिटिशांचे जास्त नुकसान झाले नाही. या ब्रिटीश सैन्याच्या तुकडीत मराठा आणि शीख सैनिक अधिक होते. भर पावसात सुरु असणाऱ्या या युद्धात टर्कीश सैन्य नेमके टप्पयात येताच आर्टीलरीच्या तुफान हल्ल्यात १००० टर्किश सैन्य मारले गेले तर उरलेले पळून गेले या युद्धात ब्रिटीश तुकडीतील भारतीय सैन्यासोबत ३०० जणांना हौतात्म्य आले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून येथे शौर्य स्मारक उभारण्यात आले.
या ठीकाणी शिलालेखावर कोरलेली कदम, चव्हाण, मालुसरे, परब, दळवी, शेडगे, मोरे, जगदाळे इ. मराठी नाव वाचताना अभिमानच वाटतो..
© Harshad Shalini Pramod Chinchwalkar

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...