विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

सरदार तुकडोजी गायकवाड :- २ डिसेंबर १७११

 


सरदार तुकडोजी गायकवाड :- २ डिसेंबर १७११
छत्रपती थोरले शाहू महाराज मोगलांच्या ताब्यातून सुटुन स्वराज्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी परिसरातील ठाणेदार यांना बरोबर राहण्यासाठी आव्हान दिले .यात खटावकर क्रिष्णराव जो मोगलाईत औरंगजेब यास सामील होता त्याला त्याणी बरोबर येण्यासाठी बाळाजी विश्वनाथ करवी कळवण्यात आले .पण क्रिष्णराव खटावकर यांने छ.शाहूंच्या आव्हानास दुर्लक्ष करून शिवाय त्यांना दुरूत्तर दिले .
याचा राग येऊन छ.शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांस खटाव गढीवर हल्ला चढविण्याचा आदेश दिला .आणी ठाण्याचे नामोनिशान मिटवून ठाणेदार यास मारण्यासाठी सैन्य पाठविले .या वेळी बाळाजी विश्वनाथ महिमानगड येथे किल्याला वेढा घालून होते. तेथून ते सैन्य निघून खटाव ठाण्याला वेढा देण्यासाठी आले तेव्हा ठाणेदार क्रिष्णराव याने युद्धाचा निर्णय घेतला .दोन्ही सैन्यात रणतुंबळ युद्ध झाले. या युद्धात तो आणि त्याचा मुलगा छ.शाहूंच्या सैन्याकडून ठार मारले गेले .आणि गढीची नासधूस केली.
या युद्धात छ.शाहू महाराज यांच्या सैन्यात मराठा सरदार तुकडोजी गायकवाड यांनी छ.शाहू महाराजांच्या स्वामी कार्यासाठी रणमैदानात आपला अमुल्य देह रणांगणावर ठेवला .ती तारीख होती २ डिसेंबर १७११ .
आज त्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया
🚩🙏💐💐💐💐 इतिहास अभ्यासक , माणिकराव पाटील , कटगुण
फोटो :- रणखांब मैदानावर खटाव
(संदर्भ -थोरले शाहू महाराज (सातारा) लेखक आसाराम सैदाणे )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...