"" मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर ""
|| भाग - २ ||
[ छत्रपतींच्या मृत्यूनंतरचा अपरिचित इतिहास ]
पोस्टसांभार :राहुल पाटील
बस , बस ..... बहोत वक्त किया इंतजार , बस संभा को हम सजाए मौत सुनाते है | उस काफिर संभा बहोत बेदर्दी और बेरहमी वाली मौत दि जाए , उस मौत के मंजर को देखनेवाले और सूननेवाले , हर एक शक्स की रूह काप उठे , इतनी दर्दनाक मौत असे नसीब
की जाए की पुरा हिंदुस्तान काप उठे | सबसे पहले , उसकी बदन की पुरी खाल निकाल दी जाए , और बदन पे नमक का पानी डाल दिया जाए , उसके बाद बदन के तुकडे किए जाए , उसकी बोटी बोटी नोचली जाए , और ध्यान रखा जाए , उसके बोटी के तुकडे चिल - कव्वो के लिए फेक दिये जाए | और किसी भी शक्स ने उन तुकडो को हात लगाने की जुर्रत की तो उसका सर कलम किया जाए | याद रखना , जो सर हमारे सामने कभी झुका नही , उस मगरूर सर को , तलवार से काटकर , भाले की नोक पर लगाया जाए , और उस सर को गाव - गाव , गली - गली फिराव , जुलूस निकालो , नचाव , ढोल नगाडे बजाव , और उसकी रयत को मजबूर करो , ये नजारा देखणे केलीए , ताकि उन्हे पता हो की , सल्तनत - ए - मुगलया के साथ दुश्मनी करने की जुर्रत करनेवालो , की आलमगीर क्या हालत करता है |
आसद , हमारे हुकूम की , तामिल हो |
【 औरंगजेबाने , शंभुराजांना दिलेली सजा ऐकूनच संपूर्ण दरबार शांत झाला , इतकी अमानुष शिक्षेची कल्पनाच तेव्हा कोणाला करवीत नव्हती , उद्याच ह्या पाशवी शिक्षेची अंमलबजावणी होणार होती , झिण -
- तुननिसे पासून मंत्री , सरदार पूर्णपणे अवाक झाले होते . 】
■ मृत्युंजय संभाजी : -
अखेर तो काळा दिवस उजाडला , सोमवार , फाल्गुन वद्य अमावस्या ,
शके १६१० [ दि. ११ मार्च १६८९ ] , हा दिवस एक विशिष्ट कारण ठेवूनच बादशहाने निवडला
, ते कारण होते ह्यादिवसाच्या पुढील दिवशी , हिंदूंचे नववर्ष सुरू होते , म्हणजेच गुढीपाडवा , नववर्षाच्या आदल्यादिवशीच जर आपण ह्यांचा राजा मारला तर , धार्मिकदृष्टीने देखील आपल्याला फायदा होईल असा औरंगजेबाचा कयास होता [ एक विशेष बाब म्हणजे , सन १६८९ साली , स्वराज्यातील कोणत्याही घरात , नववर्षाचे प्रतीक असलेली गुढी उभारली नाही गेली ] .
त्या पाशवी शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली , छत्रपती संभाजी महाराजांना आणि छंदोगामात्य कवी कलशांना
, भीमा - इंद्रायणीच्या संगमावर आणण्यात आले . आणि अमानुषपणे छळ सुरू झाला , प्रथम दोन्ही महापुरुषांच्या पवित्र देहाची कातडी काढण्यात आली , नंतर त्यावर गरम मिठाचे पाणी फेकण्यात आले , जेणेकरून प्राणांतिक वेदना व्हाव्यात , शरीराचा दाह - दाह झाला . नंतर राजांचे व कलशांचे हातपाय एक एक करून तोडण्यात आले , नंतर एक हशम पुढे सरसावला आणि त्याने शंभुराजांचे पवित्र मस्तक , पवित्र देहापासून वेगळे केले , उर्वरित देहाचे तुकडे करण्यात आले , कलशांची सुद्धा प्राणज्योत अशीच मावळली ....
अशाप्रकारे , छत्रपती संभाजी महाराजांनी , रयतेच्या सुखाकरिता , जगातल्या इतिहासातला क्रूर मृत्यू स्वीकारला , आणि शिवविचार देखील , आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत , शंभुराजांनी जपला ....
रायगडावर ही बातमी कळाली तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला , स्वज्यातील रयतेला जेव्हा समजले आपला प्रिय राजा मारला गेला , तेव्हा सर्वांस अपरिमित दुःख झाले . छत्रपती संभाजी महाराजांच्या , कैदेने व मृत्यूमुळे स्वराज्य पुर्णतः हादरले . सर्वत्र भीतीचे आणि मोगलांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते ; परंतु अशा कठीण समयी , " श्री सखी राज्ञी जयते , छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी , महाराणी , कुलमुखत्यार येसूराणीसाहेब , प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला सक्षम होत्या . त्यांनी तात्काळ प्रधानमंडळ व मुख्य सरदारांची बैठक बोलाविली , येसूबाईंना औरंगजेबाचे पुढचे पाऊल माहीत होते , त्यानुसार त्यांनी , मंत्र्यांसोबत सलाह करून एक रणनीती आखली , त्यांनी प्रथम मंत्री आणि सरदारांमध्ये , शिवछपतींच्या आदर्शाचे व शंभुछत्रपतींच्या बलिदानाने , स्फुल्लिंग निर्माण केले . तसेच हिंदवी स्वराज्यातील , सर्व किल्लेदारांस , व सुभेदारांस तात्काळ खलिता पाठविला की , " जरी छत्रपती संभाजी महाराज आज आपल्यात नसले , तरी रायगडावर आम्ही स्वतः आहोत , रामराजे आहेत , आलेल्या मोगली आक्रमणाला तोंड , किल्ला लढवा , प्राणांची बाजी लावा , प्रखर झुंज द्या " ..... तसेच प्रमुख किल्ले आहेत त्यांच्यावर काही सरदार नियुक्त केले . हेरखात्याच्या प्रमुखांसोबत बैठक केली .
■ औरंगजेब व मराठा संघर्ष सुरुवात : -
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेब दख्खन आता आपण लवकरच काबिल करू , अशी स्वप्न रंगवीत होता , तसेच नव्या मोहिमा अखित होता , त्याने त्याच्या नामचीन सेनापतींना , स्वराज्यातील दुर्ग जिंकण्यासाठी पाठविले आणि त्याने मोर्चा वळविला तो राजधानी रायगडाकडे , त्यासाठी त्याने एका पराक्रमी योध्याची निवड केली , एतिकदखान [ मोगल वजीर असदखानाचा मुलगा ] , ह्यास प्रचंड युद्धसाहित्य , तसेच ४० हजाराची फौज दिली . ही मोहीम अतिशय कठीण आहे हे खान जाणून
होता .
धूळीचे लोळ उडवीत मोगली सैन्य रायगडापाशी आले , परंतु तरीही त्याचा रायगडाच्या सुरक्षेवर काहीही परिणाम पडणार नव्हता , ४० हजार काय ४० लाख फौज स्वतः आलमगीर जरी घेऊन आला , तरीही रायगड जिंकणे अशक्य , तसेच किल्याला पूर्णपणे वेढा ही घालू शकत नाही , सुरुंगही लावू शकत नाही , कारण बऱ्याच भागात घनदाट जंगल , डोंगरी भाग होता आणि राजधानी असल्याकारणास्तव रायगडी प्रचंड युद्धसाहित्य तसेच इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात होते , रायगडचे किल्लेदार , चांगोजी काटकर हे प्रचंड पराक्रमी होते , आणि त्या समयी रायगडावर पायदळ सेनाप्रमुख , शूरवीर येसाजी कंक स्वतः होते , त्यामुळे कितीही वर्षे युद्ध केलं , तरीही रायगड अजिंक्य राहणार हे निश्चित होते , तरीही येसूबाईंनी अजून एक डाव टाकला , छत्रपती रामराजे तसेच कुटुंब आणि इतर २०० असामी , हे गुप्तमार्गाने रायगडावर पाठविले , जेणेकरून छत्रपती सुरक्षित राहावेत , हा निर्णय निर्णायक ठरला , रायगड लढत होता , मराठ्यांचीच सरशी होत होती .
खानाला काहीही यश मिळत नव्हते , त्याचा नाममात्र संघर्ष चालू होता .
परंतु इतर किल्ले मात्र पडीत होते , काही गड मावळे शर्थीने लढवीत होते , संघर्ष चालू होता , रामराजे देखील दुर्गांचा आश्रय घेत होते . एक गोष्ट होती ती म्हणजे मोगलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता , त्यातुलनेत मराठे कमी पडत होते , छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष हत्येमुळे मावळ्यांचे नितीधैर्य खचले होते , हे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांनी ओळखले होते , त्यांनी एक गुप्त योजना आखली , ती म्हणजे तुळापूरयेथील शाही छावणीत हल्ला करून , खाशा औरंगजेबाला ठार करायचे , जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला जाईल आणि मावळ्यांचे नितीधैर्य उंचावेल .
■ संताजी - धनाजींची रणनीती : -
संताजी आणि धनाजींनी , एकाच समयी फलटण व तुळापूर येथे हल्ला करण्याची रणनिती आखली . फलटण - बारामती भागात , शहाबुद्दीनखान व रणमस्तखान धुमाकूळ घालत होते , त्यांच्यावर धनाजी स्वतः चालून जातील आणि तुळापूर येथे औरंगजेबावर , खुद्द संताजी घोरपडे चालून जातील , त्यांसमवेत बहिर्जी व मालोजी घोरपडे
, शूरवीर विठोजी चव्हाण असे सरदार होते . विठोजी चव्हाण ह्यांनी ह्या मधल्या काळात अनेक छापे मोगलांवर टाकले होती , मोगल सैन्यात त्यांची प्रचंड दहशत होती .
संताजींसोबत
निवडक २ हजार स्वार मोहिमेसाठी ठरविले , छावणीत घुसल्यानंतर सैन्याची विभागणी ४ भागात केली जाणार हे निश्चित झाले , शाईस्तेखानासमयी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीती वापरली , त्यात काही बदल करूनच औरंगजेबाला ठार करायचे ठरले , एकंदर संताजींचा मूळ उद्देश हाच होता . प्रचंड गुप्तता बाळगली होती , रामराजांखेरीज मोजक्याच लोकांना ह्याची माहिती होती , कारण त्याशिवाय हल्ला यशस्वी होणार नव्हता
, परंतु ह्याबाबतीत संताजी घोरपडे निष्णात होते .
■ औरंगजेबाची फजिती : -
अंधार पडला ,
संताजीराव , फौझेसह तुळापूरच्या रोखाने , जेजुरीमार्गे निघाले . गती हे संताजी दुसरी ओळख होती , सर्वांनी योग्य ते वेषांतर केले होते , काही मावळ्यांनी हशमांचसारखं पेहराव केला होता . अखेर मोगली तळ आला , सर्वजण पुढे जात होते , मध्यरात्र झाली होती . जसे हे सारे , छावणीच्या जवळ आले , तेव्हाच
मोगल गस्तीच्या अधिकाऱ्यांनी ह्यांस अडविले , व विचारपूस सुरू केली , ह्यांना विचारले असता , " आम्ही पातशहाच्या लष्करातील , हिंदू सरदार , मोहिते व शिर्के जे आहेत , त्यांच्यातील आम्ही आहोत , बदलीला आम्ही आलो आहोत , अशी पक्की खूण सांगितल्यावर गस्तीच्या वा छबिण्याच्या पहारेकऱ्यांनी , त्यांना मार्ग दिला , तसेच ह्यांनी परवाना सुद्धा दाखविला त्यामुळे संशयास्पद काहीही वाटले नसावे .
वेळ राखून संताजी , मावळ्यांसह प्रवेशिले , ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे , बहिर्जी घोरपडे , मालोजी घोरपडे , आणि विठोजी चव्हाण , प्रत्येकी ५०० मावळ्यांची विभागणी झाली , प्रथम विठोजी चव्हाणांनी हल्ला सुरू केला , " हरहर महादेव " आणि " छत्रपती शिवाजी महाराज की जय " , अशी गर्जना करत मावळे मोगलांवर तुटून पडले , रणकंदन सुरू झाले , छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या निर्घृण हत्येचा , प्रत्येक मावळ्याच्या मनात प्रचंड राग होता , हशमांची कत्तल सुरू झाली , बहिर्जी व मालोजी मुख्य सरदारांवर चालून गेली , मोगलांची धावाधाव सुरू झाले , अंधारात मावळे कुठून येत आणि कापून जात काही कळत नव्हते , संताजी घोरपडे , गुलालबारीच्या दिशेने गेले , आपल्या प्राणांचे काहीही , होवो पण आज आपल्या धाकल्या धन्याच्या हत्येचा बदला घेणार , ह्या भावनेने संताजी पुढे जात होते , गुलालबारीत संताजी घुसले , पण पाहतात तर काय औरंगजेब , गुलालबारीत नव्हता , पुन्हा औरंगजेबाचे नशीब बलवत्तर , संताजींना खूप दुःख झाले , पण बादशहाच्या छावणीत आपण आलोत ह्याची आठवण म्हणून , संताजींनी , गुलालबारीच्या तंबूचे २ सोन्याचे कळस कापले , आणि छावणीतून पळ काढण्याचे संताजींनी , इशरतीची खूण दिली . मराठ्यांनीच
मराठे आ रहे है , आ रहे है , पोबारा केला , आणि सिंहगडाच्या रोखाने , संताजी फौझेसह निघाले . मोगली छावणीत ह्या घटनेने , संताजींची प्रचंड दहशत बसली , तसेच औरंजेबावर मराठ्यांची जरब बसली .
■ घोडी फिरवली .....
संताजी , फौझेसह
सिंहगडी आले , गडाचा किल्लेदार सिधोजी गुजर [ प्रतापराव गुजरांचा मुलगा ] , आधीच पायथ्याला आला , योजनेनुसार हे ठरले होते , जखमी मावळ्यांना येथे उपचारासाठी ठेविले , नंतर तेथुनच भोर येथे येऊन घाटाखाली उतरून , रायगडाच्या रोखाने निघाले ,
एतिकदखान रायगडाला वेढा मरून बसला होता . संताजी आता ताज्या दमाच्या फौझेनिशी त्याचा समाचार घ्यावयास जात होते . आपल्यावर आता हमला होणार आहे ह्याची बादशहाप्रमाणे एतिकखानाला कल्पनाच नव्हती . एखादा झरा जोरदारपणे जसा आदळतो तसे मराठे , मोगलांवर आदळले , आता कापाकपिला , कत्तलीला सुरुवात झाली , खानाच्या प्रमुख सरदाराला मारले , आणि ५ हत्ती तसेच काही युद्धसाहित्य , संपत्ती लुटून मराठे पळाले . मराठे कधी आले , आणि लुटून , कापून पळाले हे त्याक्षणी कळलेच नाही ; येसूबाई ह्या एकंदर घटनेवर सूक्ष्म नजर ठेवून होते . तिकडे फलटण - बारामतीला , जाधवरावांनी , मोठा पराक्रम गाजविला , रणमस्तखान व शहाबुद्दीनखानाचा पराभव केला .
■ रामराजांशी भेट : -
रायगडावरून , पार घाट चढून , वाई साताऱ्यामार्गे संताजी पन्हाळ्याला , आले . संताजींनी तुळापूर येथील बादशहाच्या शाही डेऱ्याचे कापलेले कळस , तंबूच्या कनाती , व ५ हत्ती , काही संपत्ती , छत्रपती राजाराम महाराजांच्या स्वाधीन केले .
छत्रपती राजाराम महाराजांनी , अत्यंत खुशीने संताजी , त्यांचे बंधू बहिर्जी , मालोजी , व विठोजी चव्हाण यांना वस्त्रे , भूषणे दिली . तसेच ह्या पराक्रमी योध्यां - ना पुढील किताब दिले .
● संताजी घोरपडे : - ममलकतमदार
[ राज्याचा आधारस्तंभ ] ,
● बहिर्जी घोरपडे : - हिंदूराव ,
● मालोजी घोरपडे : - अमीर - उल - उमराव ,
● विठोजी चव्हाण : - हिंमतबहाद्दूर .
पुढे दि. ५ सप्टेंबर १६८९ , ला छत्रपती राजारामराजांनी , संतांजी ह्यांस , सरसेनापती पदी नियुक्त केले .
■ संताजींची दहशत : -
लाखोंच्या सैन्यात केलेला यशस्वी हल्ला , त्यामुळे मोगली सैन्यात , सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांची प्रचंड दहशत बसली होती . औरंगजेब मृत्युच्या अगदी जवळून आला होता , त्यामुळे त्याच्याही मनात , संताजींची प्रचंड जरब बसली होती .
|| तर्किय विश्लेषण ||
औरंगजेबाने , छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या , निर्घृण हत्येने हिंदवी स्वराज्यात औरंगजेबाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती ; परंतु संताजींनी औरंगजेब बादशहाच्या , छावणीवर केलेला यशस्वी छाप्यामुळे , मावळ्यांच्या मनात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला , आणि मराठे , सरसेनापती संताजी घोरपड्यांच्या नेतृत्वाखाली मोगलांना तीव्र प्रतिकार करू लागले .
संताजींनी औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला , हा जुलै महिन्यात केला असावा , कदाचित १० ते १५ जुलै रोजी हा छापा पडला असावा , पण ह्या एका घटनेने , मराठ्यांचे नितीधैर्य उंचावले आणि मोगलांचे नितीधैर्य कमी झाले . संताजी आला , असा आवाज एकला , तरी मोगली गोटात कापरं फुटायचं , इतकी दहशत निर्माण झाली होती .
आणखी एक विशेष , छत्रपती संभाजी महाराजांच्या कैद आणि मृत्यूनंतर ,स्वराज्यातील किल्ले पडत होते , हे वास्तव होते ; परंतु एकही किल्ला औरंगजेब आणि त्याच्या सेनापतींना लढून जिंकता आला नाही , अपवाद तोरणा . किल्ले मोगल फितुरीने , तह करून ताब्यात होते , आणि एकदा किल्ला सजला , धान्य , दारुगोळा भरला की , एका अंधाऱ्या रात्री मराठे येत आणि किल्ला जिंकत असत , तोही लढून . सन १६८९ ते सन १७०७ पर्यंत , गनिमी काव्याने मराठ्यांनी मोगलांस जेरीस आणले , आणि जेव्हा औरंगजेब जेव्हा मेला तेव्हा हे थांबले .
" २५ वर्षे औरंगजेबाला कडवी झुंज देऊन , छत्रपती संभाजी महाराज , महाराणी येसूबाईराणीसरकार , छत्रपती राजाराम महाराणी , महाराणी ताराराणीसाहेब , ह्यांनी शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य राखले , आणि नंतरच्या काळात , छत्रपती शाहू महाराजांच्या काळात , हिंदवी स्वराज्याचे एका विशाल साम्राज्यात रूपांतर झाले , मराठ्यांच्या
भगव्याला हिंदुस्तानात , १७ शतकात सर्वांत उंच स्थान प्राप्त झाले " .
========■■■■●■■■■========
छत्रपती शिवाजी महाराजांच्या , हिंदवी स्वराज्यासाठी आणि रयतेच्या सुखासाठी , बलिदान देणाऱ्या , छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ......
■ संदर्भ ग्रंथ : -
●छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा. सी. बेंद्रे ) ,
● शिवपुत्र संभाजी ( सौ. कमळ गोखले ) , ●ज्वलनज्वलज्वतेजस संभाजीराजा ( डॉ . सदाशिव शिवदे ) ,
● राजा शंभूछत्रपती ( श्री . विजय देशमुख ) ,
● अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज ( ऍड . अनंत
दारवटकर .
● मराठ्यांची इतिहासाची साधने ,
● मराठा - पोर्तुगीज संघर्ष ( श्री. सरदेसाई )
●ऐतिहासिक पत्रव्यवहार ,
●ऐतिहासिक बखरी , इंग्लिश दस्ताऐवज
● जेधे शकावली ,
● शिवकाल ,
● संभाजी ( श्री. विश्वास पाटील ) ,
● इतर ग्रंथ .
■ = ■ = ■ ●●●●●●●● ■ = ■= ■
No comments:
Post a Comment