*".....पथकानिशी तुळापूरमुक्कामी बराबदुद पातशाह यांच्यावर छापा घालतो व मराठे आहो असे खाशास कळवून येतो."*
*संभाजीराजांचा मृत्यू झाला आता मराठ्यांचे राज्य संपले,या धुंदीत मोघल गाफील असतानाच संताजीराव २००० स्वार घेऊन औरंगजेबाच्या तुळापूरच्या छावणी वर तुटून पडले,रणकंदन माजले. खासे संताजींनी बादशहाच्या गुलालबार तंबू कडे घोडा फेकला.दुर्दैवाने बादशहा त्यावेळी झिबुन्निसाच्या तंबूत असल्याने वाचला.संताजीरावांना आपल्या संभाजीराजांचा व संगमनेर येथे,हिफाजत करताना कामी आलेल्या आपल्या वडीलांचा ल प्रतिशोध न घेता आल्याने संतापले,त्यांनी बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळस छाटून नेले.औरंग्याचं दैव बलवत्तर म्हनूण वाचला नाहितर कळसा ऐवजी त्याचे मुंडके छाटले असते आणि तंबुतून ताबुतात रवानगी केली असती,हे मात्र नक्की.*
*लाखाच्या पटीत असलेल्या सैन्यात मुठभर सैन्य घेऊन घुसण्याचं काळीज फक्त मराठाच बाळगू शकतो...त्याला एक वेडेपण लागते...प्रतापराव गुज्जरांनी जे केले तेच वेडेपण हे सर्व मराठयां मध्ये होते..."वेडात मराठे वीर दौडले सात"...कोण म्हणतंय सात???? असे किती तरी वीर...वेळो वेळी निधडी छाती घेऊन युद्धाला सामोरे गेलेत...कित्येकांनी प्राणाची आहुती दिलीय...कित्येकांनी शत्रूच्या धडांचे थर च्या थर रचलेत...कित्येकांची शौर्यगाथा हि अजूनही अकथितच आहे...प्रत्येक मराठ्याने अभिमानाने छाती बडवून बडवून रक्तबंबाळ होई पर्यत सांगावे असे हे संताजी घोरपडेंचे शौर्य आहे...संताजी म्हणजे स्वराज्याच्या शत्रुंसाठी साक्षात मृत्यूच.,*
*पडत्या काळात मराठेशाहीला सावरणारे खंदे वीर,सरसेनापती संताजीराव घोरपडे यांस विनम्र अभिवादन*
No comments:
Post a Comment