विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 29 January 2021

शौर्यगाथा भुजंगराऊंच्या महा-पराक्रमाची

 


शौर्यगाथा भुजंगराऊंच्या महा-पराक्रमाची

मराठ्यांचे सेनापती मुरारराऊ घोरपडे ह्यांना भुजंगराऊ म्हणून भाऊ होते.
आजचा लेख हा भुजंगराऊ घोरपडे ह्यांच्या महा-पराक्रमावर आधारीत आहे.
टीप: ह्यापुढे कोणीही 'पेशवेकालीन इतिहास' असा चुकीचा शब्द वापरायचा नाही. 'उत्तर मराठाकालीन इतिहास' असा योग्य शब्द वापरावा.
'पेशवे' हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हद्दपार केलेला शब्द आहे.
जर तुम्ही पेशवा शब्द वापरला तर मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात हे लक्षात ठेवावे.
जे ह्यापुढे 'पेशवा' शब्द वापरतील ते औरंगजेबाच्या फौजेतील.
'पेशवे' ह्या जागी 'प्रधान' हाच योग्य शब्द आहे.
ह्या भुजंगराऊंच्या आधी तुम्हाला सेनापती मुरारराऊ घोरपडे ह्यांची थोडक्यात माहिती सांगतो.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
छत्रपती राजाराम महाराजांचे प्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांस बहिर्जी नावाचे बंधू होते. त्या बहिर्जी यांचा मुलगा शिदोजी आणी त्या शिदोजी यांचा मुलगा मुरारराऊ होय.
संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर बहिरजीने कर्नाटकांत स्वतंत्रपणे गजेंद्रगड, गुत्ती वगैरे प्रांत मिळविला.
पुढे मुरारराऊ घोरपडे ह्यांनीही उत्तर मराठा काळात ३० वर्षे स्वतंत्रपणे वागून हैदरअली, फ्रेंच, इंग्रज, अर्काटचा नबाब, साबनूर आणी कडाप्पाचा नबाब यांना एकमेकांविरुद्ध झुंजवून मराठ्यांचा फायदा करून घेतला.
मुरारराऊ घोरपडे यांच्याजवळ ८ ते १० हजार घोडदळ असून ते उत्कृष्ट दर्जाचे होते.
मराठ्यांच्या कर्नाकांतील बहुतेक मोहिमांत मुरारराऊ घोरपडे ह्यांनी काम केले. मुरारराऊ घोरपडे हे अत्यंत शूर, मुत्सद्दी आणी धोरणी फौजबंद सरदार होते.
टिपू सुलतानचा बाप असलेल्या हैदरअलीवरील पहिल्या स्वारीत हे मुरारराऊ घोरपडे आपल्या फौजेसहित छत्रपती शाहू महाराजांना सामील झाले होते. तेंव्हा श्रीमंत शाहू छत्रपतींनी मुरारराऊ घोरपडे ह्यांस सेनापतिपद दिले होते आणी त्यांचा मुलुख हैदराजवळून जिंकून त्यांना परत दिला होता.
मुरारराऊ घोरपडे हे मोठ्या अभिमानाने आपल्याला मराठ्यांचा म्हणजे श्रीमंत स्वामी शाहू छत्रपतींचा सेनापती म्हणत असत.
ह्या मुरारराऊ घोरपडे ह्यांचे बंधू भुजंगराऊ घोरपडे हे हि महाशूर होते.
सुरु करूयात भुजंगराऊ घोरपडे ह्यांच्या महा-पराक्रमाची गाथा.
टीप: खालील सहा ओळी ह्या मोठ्या आवाजात वाचाव्यात हि विनंती.
घोरपडे मुरारराऊ यांचे बंधू भुजंगराऊ १७- १८ वर्षांची उमर होती.
फार दाटी जाली तेंव्हा लोक कचे-पके होऊ लागले.
तेंव्हा भुजंगराऊ ह्यांनी बेजरब घोडा चालविला.
लोकांस शिव्यागाली करून जुंज सावरिले.
इतकीयांत आकस्मात तोफेचा गोला येऊन भुजंगराऊ ह्यांची खोपडीच उडून गेली.
भुजंगराऊ मृत्यू पावले.
**
फक्त सहा ओळी आहेत.
शौर्याची परिसीमा कशी असते हे ह्या वरील सहा ओळींवरून तुम्हास दिसून येईल.
**
साधनांच्या कमतरतेमुळे हि लढाई नेमकी कोणात आणि कुठे झाली ह्याची माहिती माझ्याजवळ नव्हती.
प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि संशोधक श्री प्रवीण भोसले सरांनी मला ह्या विषयी माहिती सादर केली. त्यामुळे मूळ लेखातील माहितीत बदल केला आहे.
तिरुवेत्तीच्या २० जानेवारी १७५३ च्या पहिल्या लढाईत मुरारराऊ घोरपडे ह्यांनी इंग्रजांच्या १०० सैनिकांना ठार केले. इंग्रज पुन्हा सेंट डेव्हिड मधून मोठे सैन्य आणि इतर साहित्य घेऊन घोरपडे ह्यांच्यावर चालून आले.
ठरलेल्या कराराप्रमाणे फ्रेंचांनी मुरारराव घोरपडे ह्यांना मदत करायची होती. पण फ्रेंचांनी ऐन लढाईत कच खाऊन माघार घेतली.
१ एप्रिल १७५३ रोजी तिरुवेत्तीच्या दुसऱ्या लढाईत इंग्रजांच्या सैन्याविरुद्ध लढताना भुजंगराऊ तोफेचा गोळा मस्तकी लागून धारातीर्थ पडले.
ह्या प्रसंगी खुद्द मुरारराऊ ह्यांच्या घोड्यालाही गोळी लागून घोडा ठार झाला.
ह्या लढाईतही इंग्रज सैन्याचे फार मोठे नुकसान झाले.
तात्पुरती माघार घेऊन मुरारराऊ ह्यांनी पुन्हा मे १७५३ मध्ये तिरुवेत्तीच्या किल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला आणि भावाच्या हत्येचा सूड उगविला. . ह्या लढाईत मराठ्यांचा पराक्रम पाहून इंग्रज लढाई सोडून अक्षरशः पळून गेले.
**
लढाईच्या वेळी ह्या भुजंगराऊ घोरपडे ह्यांचे वय केवळ १७-१८ वर्षांचे होते.
इंग्रजांच्या फौजेने मराठ्यांच्या फौजेला चौफेर वेढल्यामुळे फार दाटी होऊन मराठ्यांच्या फौजेतील लोक कचे-पके म्हणजे हतबल होऊ लागले.
फौजेचा हा हतबलपणा पाहून तातडीने भुजंगराऊ घोरपडे ह्यांनी बेजरब म्हणजे कुठलीही जीवाची पर्वा न करता आपला घोडा इंग्रजांच्या फौजेवर चालविला.
भुजंगराऊ घोरपडे ह्यांनी हतबल झालेल्या आपल्या फौजेतील लोकांस शिव्या-गाली देऊन हुरूप जागवून झुंज सावरली आणी पुन्हा लढाई जिंकती केली.
इतक्यात दुर्दैवाने अकस्मात इंग्रजांच्या फौजेतून तोफेचा गोळा येऊन भुजंगराऊ घोरपडे ह्यांच्या मस्तकी धडकला ज्यात भुजंगराऊ यांची 'खोपडीच' म्हणजे मस्तक उडून गेले.
भुजंगराऊ मृत्यू पावले.
**
अशी हि घनघोर लढाई. ह्या लढाईत भुजंगराऊ ह्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
मृत्यू समई भुजंगराऊ ह्यांचे वय केवळ १७-१८ वर्षांचे होते.
निष्ठा आणि शौर्य हे रक्तात असावे लागते.
हा मर्दांचा इतिहास आहे.
आमच्या मातीला शौर्याचा आणी शूरांचा वारसा आहे.
हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा आहे.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
ह्याच शूरवीरांच्या 'महा-पराक्रमामुळे' मराठ्यांचे हे स्वराज्य अखंड हिंदुस्थानवर पसरले.
**
मला माहित आहे.
शनिवारवाड्याच्या उंबऱ्यावरील इतिहासकार कधीही हा इतिहास लिहिणार नाहीत.
का?
कारण मग त्यांच्या पेशव्यांचे (नसलेले) गुणगौरव कोण करेल?
शनिवारवाड्यातील प्रधान चाकरास श्रीमंत स्वामी शाहू छत्रपतींपेक्षा मोठे करण्याच्या 'नादान हट्टापायी' ह्या शनिवारवाड्याच्या उंबऱ्यावरील इतिहासकारांनी श्रीमंत स्वामी शाहू छत्रपती महाराजही इतिहासात 'नाममात्र' करून टाकले.
कानात भिकबाळी घालणाऱ्या त्या पुणेरी शृंगारिक 'राऊ' पेक्षा; आम्हास १७-१८ वर्षांच्या वयात घोड्यावर बसून; रणांगणावर मर्दुमकीने तलवार चालवून; रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थ पडणारे भुजंग 'राऊ' घोरपडे जास्त प्रेरणादायी, अभिमानास्पद आणी कौतुकास्पद वाटतात.
(शेवटचा उतारा परत एकदा मोठ्या आवाजात वाचावा हि विनंती.)
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...