कुलकर्णी हे मुळात एक वतनदार पद असायचे ज्याचे काम हे गावाचा मुख्य म्हणजे पाटील याचा सहाय्यक म्हणून असे.
कुल म्हणजे दाक्षिणात्य भाषांमध्ये शेती व करण म्हणजे त्याचा हिशोब ठेवणारा अधिकारी. म्हणजे थोडक्यात गावातील सर्व शेती, जमिनी व कर यांचा हिशोब बघून, गोळा करण्यासाठी या कुलकर्णी पदाची गरज असत. यांच्या नोंदी ठेवायला म्हणून यांच्या हाताखाली मोहरीर हा अधिकारी असायचा. यासाठी त्यांना गावात काही अधिकार असत जसे
- धनगरांंकडून वार्षिक २ चवाळी
- चांभारांंकडून १ जोडा
- मोमिनांंकडून १ मुंडासें
- कोष्ट्यांंकडून १ पासोडी
- साळ्यांंकडून १ धोतरजोडा
- ढवणांंकडून रुमाल
- तेल्यांंकडून दर आठवड्यास दर घाण्यास तेल ९ टाक
- खाटाकांंकडून १ रुका (पै)
- तांबोळ्यांंकडून २५ पानें
- हलवायांंकडून २ पैसे
- बकालाकडून १ सुपारी
- माळ्यांंकडून मालाप्रमाणें गूळ दर बैलास सव्वाशेर, दर पाटीस पावशेर केळीं दर बैलास पांच.
याशिवाय पुढील हक्क असत ते
- कतबा अगर तक्रारीचे अर्ज लिहिल्यानंतर वादी व प्रतिवादी यांच्याकडून दोनदोन आणे.
- गांवांत लग्न किंवा पाट झाल्यास धान्य व शिधा १० रुपयांपर्यंत.
- कागदाबद्दल वार्षिक १२ रुपये याप्रमाणें या हक्कांच्या रकमेची रोख किंमत ४२५ रुपये येत.
शिवाय मुशाहिरा असे ज्याप्रमाणे गावांतील प्रत्येक शेतकर्यापासून धान्याच्या दरखंडीस दीड रुपये प्रमाणें रक्कम मोहतर्फा (कारागीर) लोकांकडून.
कुलकर्ण्यांंस एकंदरींत मुशाहिरा व हक्कलाजिमा मिळून वार्षिक सहाशे रुपयांपर्यंतची प्राप्ति व्हायची.
कुलकर्णी हे आडनाव फक्त ब्राह्मण जातीतच येते. पण हे पद असल्याने यावर ब्राह्मणांव्यतिरिक्त पूर्वी सफाईदार लेखणी चालविण्यात पटाईत असलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू लोकांची देखील नेमणूक होऊ लागली. म्हणून त्यांच्यात जे लोकं या पदावर असत ते स्वतःस कुळकर्णी असे आडनाव लावत.
लिंगायत लोकांमध्ये देखील वाणी आणि पंचमशाली जातीत हे आडनाव असते ही माहिती श्री सूरज शशिकांत डबिरे अशी माहिती यांनी दिली.
स्थलपरत्वे या पदास गुजरात, बागलाण, खान्देशात पांड्या तर दक्षिणेकडे पटवारी असेही म्हणत.
स्त्रोत: भारतीय संस्कृती कोष
No comments:
Post a Comment