जिंजीपासून वांदीवॉश हे ठिकाण २५ मैल येथे मोगलांची अन्नधान्य सामग्री. ती आणण्याचा झुल्फिकारखानाचा प्रयत्न चालू होता दोन अयशस्वी प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झला मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती कि उपाशी सैनिकांनी रात्री तांड्यावर हल्ला करून ते लुटले या हल्ल्यातून वाचलेले सैन्य घेऊन तो वांदीवॉशहून तळाकडे निघाला मार्गात देसुर या ठिकाणी संताजी घोरपडे यांनी आपल्या २० हजार सैन्यासह त्याचावर हल्ला चढविला तो दिवस ५ जानेवारी १६९३....
मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भीमसेन लिहितो..,
जुल्फिकार खान प्रत येण्यास निघाला मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते त्यांनी मोगलांची वाट अडविली मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळली आणि त्याने शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले दुसऱ्याच दिसावी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले त्यांनी निकराचे हल्ले चढविले त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगलांच्या सोबत अस्केके वंजारी हवालदिल झाले मराठ्यांची बंदुकी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या जुल्फिकारखान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्य आम्ही कुच करीत असताना वाटेत भातशेते लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली...
पळता भुई थोडी केली या मोगलांची मराठ्यांनी सह्याद्रीच्या कुशितले हे वाघबच्चे कर्नाटक जिंजी सारख्या परराज्यात देखील पराक्रमाचे तमाशे दाखवीत होते आपली तलवार गाजवीत होते गुलामी मराठ्यांच्या रक्तातच नाही म्हणून राजाशिवाय प्रजा कित्येक काळ झगडत होती त्या रावदलपत ला सुचेना काय करायचे जुल्फिकारखान तर पाठीला पाय लावून पळत सुटला त्यांचे सैन्य चहू बाजूला आपला जीव मुठीत धरून पळत सुटले होते...
No comments:
Post a Comment