विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 12 January 2021

सन १५९९ ते १६८० दौलोजीची कोकणावर चाल (१२ जानेवारी १६६०)...

 


सन १५९९ ते १६८० दौलोजीची कोकणावर चाल (१२ जानेवारी १६६०)...
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचले नव्हते दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती ह्याची माहिती राजांना होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली...
राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या १६५९ डिसेंबरच्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला १२ जानेवारी १६६० ला राजांचे पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले.. अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला जैतापूरला काही इंग्रजांनी राजांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली १५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले. त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...