विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 January 2021

१२ जानेवारी १७७९ वडगावची लढाई...

 


१२ जानेवारी १७७९ वडगावची लढाई...
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले...
जानेवारी १७७९ मध्ये ३९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले...
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले यात साष्टी ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला महादजींने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली...
➖➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : समीर साठे (सफर मराठी)...♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...