खेड़ेबारे तालुक्यातील रांझे या गावच्या बाबाजी गुजर नावाच्या एका पाटलाने एका स्त्रीशी बदफैलीचे वर्तन केले होते ही अनितीची गोष्ट शिवाजी महाराजांना खपणारी नव्हती. जेंव्हा ही बातमी शिवाजी महाराजांच्या कानावर आली तेंव्हा त्यांनी बाबाजी गुजर याची पाटील की जप्त केली आणि त्याचे हातपाय तोडावेत अशी आज्ञा केली या शिक्षेची अंमलबजावणी झाली आणि त्या पाटलचा चौरंग करण्यात आला. शिक्षेमुळे बाबाजी अपंग झाला पण त्या पाटलाचा एक भाऊबंद सोनाजी गुजर हा त्याचे पालन करायला उभा राहिला आणि बाबाजीच्या अपराधाबद्दल शिवाजी महाराजांकडे माफ़ी मागितली म्हणून शिवाजी महाराजांनी बाबाजी पाटील याची पाटीलकी सोनाजी गुजर यास दिली.. अशा पद्धतीने निग्रह म्हणजे शिक्षा आणि अनुग्रह म्हणजे कृपा या राजसत्तेच्या दोन्ही बाजू शिवाजी महाराजांनी रयतेच्या प्रत्ययाला आणून दिल्या असे दिसते ..
रांझाच्या पाटलाच्या याबाबतचे पत्र हे शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले पहिले पत्र आहे आणि याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २८ जानेवारी १६४६
◆ संदर्भ - १) मराठा सत्तेचा उदय -
डॉ. जयसिंगराव पवार
२) अशी होती शिवशाही - अ. रा . कुलकर्णी
No comments:
Post a Comment