"पांच कोट रूपये, तीस लाखांचा मुलुख, देवगिरीचा किल्ला, नागपूरकर भोसले यांचा जो मुलुख दाबला आहे व जो वसूल देणे आहे त्याचा फडशा करावा, दक्षिणेत बिलकुल गोवध न करावा, हिंदूंचे जाग्यास उपद्रव न देणे, हिंदूंच्या धर्मास खलष न करणे, आपाआपले चालीने धर्मावर कायम चालणे या अटीशर्ती मान्य करून "निजामाने" मराठ्यांसमोर गुडघे टेकले.."
या युध्दात दोन्ही बाजूंनी सर्व शस्त्रास्त्रे परजली गेली. मुत्सद्दी, दिग्गज रणवीर आमनेसामने लढले. निजामाच्या फौजेचा मोड करणार्या आघाडीवर एक कोवळा मराठा सुपुत्र लढला होता.. त्याचे वय होते अवघे अकरा वर्षे.. दौलतराव शिंदे यांच्या लष्करातील जिवबादादा बक्षी यांच्यासमवेत आघाडीस जाऊन त्या कोवळ्या पोराने अतुलनीय पराक्रम गाजवत तरवार परजत निजामाच्या अवलादींना दस्तुरखुद्द रणांगणावर प्रत्यक्षात अस्मान दाखवले.. त्या वीर अभिमन्यूचे नाव होते..
"सेनासप्तसहस्त्री", "श्रीमंत दुसरे तुकोजीराव महाराज पवार"
"सेनासप्तसहस्त्री", "श्रीमंत दुसरे तुकोजीराव महाराज पवार"
इतिहासाने स्वतःच्या पानांवर सुवर्णाक्षरात कोरलेले विधिलिखित शिवसूर्यजाळाच्या प्रखर प्रकाशाप्रमाणे अव्याहत झळाळत आहे.
श्रीमंत तुकोजीराव पवार यांच्या गौरवार्थ त्याकाळी एक दोहा रचला गेला..
कृष्णराव के पुत्र थे, तकूराव बलवान |
छोटे थे पर वीर बहु, करने चले घमासान ॥
तीस लाख को परगनो, कब्जो कियो तमाम |
और लियो आसेर को, दौलत बाद ही नाम ॥
"सेनासप्तसहस्त्री", "श्रीमंत दुसरे तुकोजीराव महाराज पवार" यांचे चित्र जोडत आहे.
संदर्भ -
पवार, विश्वासराव घराण्यांचा ऐतिहासिक कागद संग्रह
पेशवे दप्तर
सेनासप्तसहस्त्री पवार
मराठी रियासत
धार संस्थानचा इतिहास
संस्थान देवास पवार (थोरली पाती) घराण्याचा इतिहास
खर्ड्याची लढाई
Facebook Memories
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.
No comments:
Post a Comment