विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 February 2021

२८ फेब्रुवारी १७३८ धारावीचा किल्ला....

 


२८ फेब्रुवारी १७३८ धारावीचा किल्ला....
वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे....
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते...
१२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...