२८ फेब्रुवारी १७१९...
―――――――――――――――――――
आम्ही जंग जंग पछाडले, आसवांचे आगडोंब शमविले, पण त्या अश्रूतून जन्माला आलेला भडाग्नीतून असे काही निखारे फुलले, की आम्ही पाठ भिंतीला टेके पावेतो लढलो. हुंडी खंडी भरासाठी लढणाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होत लढा उभारला अन इतिहासाला आपल्या कर्तृत्वाची दखल घेणे भाग पडले. आणी यानंतर जेते म्हणून कित्येक दशकं मराठ्यांचाच इतिहासात लिहिला गेला...
पण तरी काही जुने प्रश्न मार्गी लागणे बाकी होते, याची सुरवाज झाली ती राजमातेच्या सुटकेच्या तयारीतून...
राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात ३५००० ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली , बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा असा ठराव होता...
मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या त्या बादशाह ने अमान्य केल्या त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली ज्यामध्ये २००० मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते या गोष्टीमुळे मराठे चवताळले... बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले.
२७ फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. व ३० वर्षांचा राजबंदी नावाच्या सोनेरी कुंपणातून राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका झाली...
पुढे १९ एप्रिल १७१९ रोजी बादशाह फारुखसियर चे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले नवीन बादशहा रफी ऊत दर्जत कडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या व कागदोपत्री येसूबाईंची सुटका झाली आणी मराठे पुन्हा साताऱ्याला परतले...
―――――――――――――――
चित्रकार : मिलिंद विचारे...
―――――――――――――――
Abhishek Kumbhar
No comments:
Post a Comment