विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

वेडात मराठे वीर दौडले सात

 


वेडात मराठे वीर दौडले सात
आमच्या सोबत आपण सामील होऊन जावा पाहिजे ते आपल्या पायात टाकून देऊ शकतो. तुमच्यासारखा शूर योद्धा आमच्यासोबत असणे हे, आमचे सौभाग्य ठरेल,” मिर्झाराजे ह्यांनी निडर कुडतोजीराव गुजर ह्यांच्यापुढ्यात हा प्रस्ताव मांडला.
मुघलांचे सुरु असलेली असुरी कृत्य कुडतोजीरावांना सहन झाले नाही आणि आपल्या घरादाराची व स्वतःची देखील पर्वा न करता ते मिर्झाराज्यांवर चालून गेले. त्यावेळी त्यांचे धाडस बघून मिर्झाराजेंना अत्यंत कौतुक वाटले आणि असा शूर योद्धा आपल्यासोबत असावा असे त्यांना वाटले.
“आमचे स्वर्ग फक्त महाराजांच्या चरणांशी आहे” असे कुडतोजीराव मिर्झाराजे ह्यांच्या प्रस्तावावर बोलले. कुडतोजीरावांना काहीही हानी न करता मिर्झाराजे त्यांना सोडून देतात.
परंतु, आपल्या घरादाराची पर्वा न करता उचलेल्या ह्या पावलावर शिवाजी महाराज कुडतोजीरावांवर रागावतात. मात्र, त्यांनी केलेल्या या प्रतापी कार्यामुळे ‘प्रतापराव गुजर ‘ अशी पदवी महाराजांनी त्यांना दिली. त्यानंतर “स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रताराव गुजर ” झाले.
मुघलांविरोधातील मराठ्यांची पाहिली सगळ्यात मोठी लढाई म्हणजे, ‘किल्ला साल्हेर ‘ची लढाई…
मुघलांचा मोठा सैनिक दिलेर खान, त्याच्या सोबतीला राजस्थानचे राजपूत, पठाण आणि रोहिल्ले… तब्ब्ल ४५ हजारांची मोठी फौज…
दुसरीकडे स्वराज्याची स्थापना करण्याची पवित्र जिद्द असणारे,सेनापती प्रतापराव गुजर, पेशवा मोरोपंत पिंगळे आणि शिवरायांच्या प्रेमाने भारावून गेलेले १० हजार मावळे…
‘किल्ला साल्हेर ‘ची लढाई मराठ्यांनी जिंकली. आणि प्रतापराव गुजर, महाराजांच्या अधिक जवळच्या आणि हक्काच्या व्यक्तींपैकी एक बनले…
परंतु म्हणतात ना , जो जास्त जवळचा असतो त्याच्यावर हक्कही तेवढाच जास्त असतो. आणि जेव्हा जवळचा माणूस काही बोलतो, तेव्हा ती गोष्ट मनाला जास्त दुःख देऊन जाते. तसेच येथेही घडले.
स्वराज्यात बहलोलखान धुमाकूळ घालत होता. रयतेचा छळ करत होता. तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी गुजरांना दिली आणि खानाचा वाढ करण्याचे आदेश प्रतापरावांना दिले. गनिमी काव्याने प्रतापराव गुजर यांनी खानास डोंगरदर्यातच पकडले. मात्र, खान वेळ प्रसंग पाहून शरण आला. शरण आलेल्याला युद्धात मारू नये असे प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. म्हणूनच प्रतापराव गुजर हे मेहेरबान झाले व त्यांनी खानास सोडून दिले.
जेव्हा महाराजांना हे समजले तेव्हा,आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा राग आला. प्रतापरावांची कान उघाडणी करत त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवले. “तुम्ही केलेली हि कामगिरी एका सेनापतीला शोभणारी नसून शिपाईगिरी झाली ” ह्याचसोबत त्या पत्रात महाराजांनी लिहले होते की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.
हि गोष्ट, प्रतापरावांच्या मनावर बाण चालवून गेली…
प्रतापराव गुजर निराश झाले, दुःखी झाले. जीवाची तगमग होत होती आणि काय करू हे त्यांना सुचेना. “खानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही ” असे त्यांनी ठरवले.
आपले सर्व भान सोडून, केवळ बहलोलखानाच्या वध हि एकच बाब त्यांच्या डोक्यात… मुघलांच्या १५००० सैनिकांमध्ये प्रतापराव, आपल्या सहा शिलेदारांसह झुंझ देण्यास निघाले…
विसाजी बल्लाळ,विठ्ठल पिलाजी अत्रे,दिपाजी राउत,सिद्धी हिलाल,विठोजी शिंदे,कृष्णाजी भास्कर आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर.. मुत्यु कडे आपण जात आहोत हे माहिती असेल तरीही त्यातल्या एकाचेही पाय डगमगत नाहीत.
“श्री छत्रपती शिवाजी महाराज” ही एकच व्यक्ती त्या सर्वांची ताकद-शक्ती…
सूर्याचे सात घोडे तसे हे सात वीर मुघलांच्या सैन्यामध्ये तीव्र वेगाने पुढे सरसावत होते… येणाऱ्या सैन्याचीही त्यांनी वाट पहिली नाही,आणि हे सात वीर जो दिसेल त्याला कापत पुढे सरसावत राहिले…
नेसरी मध्ये २४ फेब्रुवारी १६७४ ला, ह्या सात वीरांना वीरगती प्राप्त झाली… शिवरायांना त्यांच्या मृत्यूचे दुःख झाले, आणि आमच्या बोलण्याचा अर्थ काय घेतलात… तुमच्या शौर्याची किंमत आहे होती आणि राहणार, असे उद्गार माझ्या राजाच्या तोंडून निघाले…🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...