विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 February 2021

बुऱ्हाणपुर आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते...

 


बुऱ्हाणपुर आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते...
लेखन :Indrajeet Khore
बुऱ्हाणपूर हे शहर आजच्या मध्यप्रदेशातील पूर्व निमाड
जिल्ह्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर असून ते तालुक्याचे व उपविभागाचे मुख्यालय आहे.कापसाच्या
वापराचे केंद्र व हातमाग कापडाच्या उद्योग धंद्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
बुऱ्हाणपूरचे पूर्वीचे नाव ' बसना ' खेडे असे होते.खानदे-
शाचे फारुकी नबाबांचे नेहमीचे राहण्याचे हे ठिकाण.
इ.स.१४०० मध्ये नासीरखान फारुकी याने राजधानी म्हणून उदयास आणले.पुढे आकबराने खानदेश जिंकले
आणि खानदेश सुभ्याचे मुख्यालय केले.मात्र फारुकी नबाबांनी हे शहर कसे कटकारस्थान करून वसविले
त्याचा एक काळा इतिहास आहे...
' नासीर फारुकीचा बाप मलिक फारुकी याचा मित्र असिरगडचा राजा ' आशा 'हा होता.अहिर जातीचे हे घराणे.राजा आशा आणि फारुकी घराण्याचे पूर्वी पासूनच
घरोब्याचे व मित्रत्वाचे समंध,( पण फारुकीने दोस्ततीत कुस्ती केली...त्याचा तरी काय दोष रक्तच हरामी...)असो
तर ' बागलाण आणि अंतूर या ठिकाचं सैन्य माझ्यावर
आक्रमण करण्यासाठी येत आहे तेव्हा तू मला तुझ्या किल्ल्यात आश्रय दे,असा निरोप फारुकीने राजा आशा
ला पाठवला,आणि पडद्याच्या पालख्यातून सशस्त्र सैन्य
किल्ल्यात घुसवल,फारुकीच्या हशमांनी लगेच आशा
राजाच्या कुटुंब-कबील्यावर हल्ला करून सर्व सदस्यांच्या
कत्तली केल्या व किल्ल्याचा ताबा घेतला.
आशा प्रकारे दगा करून विजय मिळवल्या बद्दल नासीर
फारुकीचा धर्मगुरू झैनुद्दीन याने फारुकीचे अभिनंदन
केले.दौलताबादचा संत बुऱ्हाणुद्दीन याची यादगारी म्हणून ' बुऱ्हाणपूर ' आणि धर्मगुरू झैनुद्दीन याची यादगारी म्हणून " झैनाबाद " ही दोन शहरे तापी नदीच्या तीरावर आमने-सामने वसवून फारुकीने धन्यता मानली.
(इ.स.१५९९)
स्वतः ला गझणीचे वंशज समजणाऱ्या नासीर फारुकीने
तापी नदीच्या उजव्या काठावर एक ठोलेजंग असा वाडा
बांधला.त्याला सीटाडेल ( citadel fort ) किल्ला म्हणतात.परत त्यात पिरबेन्ना नावाची मशीद बांधली तिचा मनोराच ८० फूट उंचीचा होता इतरही बरीच बांधकामे त्यांनी केली.पुढे अकबराने ( इ.स.१६०० ) मध्ये असिरगड व बुऱ्हाणपूर जिंकले,आणि शहरामध्ये
परत सुधारणा केल्या.मोगल साम्राज्याला शोबेल असे क्रमांक दोनचे शहर बनिवले. उद्यानाचे,बागबगीचे असलेले शहर म्हणून प्रसिद्ध असल्याचे " ऐन इ आकबरी
मध्ये नोंदविले आहे.
कलाकुसर,चांदीच्या तारा आणि सुवर्ण तारा गुंफण्याचे सुबक काम करणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याची कमाल दाखवणारे हे शहर होते. बुऱ्हाणपूर शहराच्या बाहेर
नबाबापुरा,बहादूर,करणपुरा,खुर्रमपुरा,शहाजंगपुरा इ.-
सतरा पुरे मोगलांच्या काळात होते.त्यातील बहादुरपुरा
हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता.सोने, चांदी, हिरे मोती
उंची वस्तू,उंची अत्तरे,भारी किमतीची कापड-चोपड इत्यादी गोष्टी असलेले व्यापारी या ठिकाणी राहत होते
सर्वच लाखोपती,करोडपती,म्हणजे धनाढ्यांची कुबेरनगरी म्हणावी लागेल.
बुऱ्हाणपूर म्हणजे दख्खनच्या वाटेवरचं मोगलांचं मुख्य
संरक्षक ठाणं होतं.दिल्लीहून निघालेली मोगलांची फौज
आधी इथे टेकून,विश्रांती घेई नि मग पुढे जात असे.
उत्तरेतून येणारी सामग्री,दारूगोळा,खजिना आधी इथे
नि मग सैन्यच्या संरक्षणात दक्षिणेत धाडला जायचा.
दळणवळणाच्या वाटेवरचं मुख्य ठाणं म्हणून अनेक
व्यापारी,जवाहिरे,सावकार व सौदागर या शहरात वास्तव्याला होते.
तापी नदीच्या किनाऱ्यावर बुऱ्हाणपूरापासून ४ मैलाच्या
अंतरावर मोहना नदीच्या संगमावर मिर्झाराजा जयसिंहाची छत्री आहे.दक्षिणेतून परतीच्या प्रवासात
मिर्झाराजे तेथे वारले.( मिर्झाराजाच्या मनात आलं असत
तर नक्कीच त्यांनी दिल्लीच मयूर सिंहास हासील केलं
असतं )इ.स.१७१६ मध्ये मराठ्यांनी बुऱ्हाणपूरची चौथाई
वसूल केला.पुढे पशवे ( ग्वाल्हेरकर शिंदे १७७८ )यांनी हे
शहर घेतले.
या शहराचा औरंगजेब बादशहा यांच्या भावभावनांचा
अगदी घट्ट संबंध होता.औरंगजेबाची प्रथम प्रीती याच
बुऱ्हाणपूरात फुलली.दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेब बुऱ्हाणपूरला थांबला.त्यावेळी मिरखलीद हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा सुभेदार होता.तो गडी पण रंगेल होता,आता सुभेदार म्हल्यावर सांगण्याची काही गरज नाही.भलामोठा जनानखाना होते सुभेदारसाहेबांचा
आणि त्या जनानखान्यातल्या हिराबाई या स्त्रीला औरंगजेबाने जैनाबादी बागेत पहिलं,आंबे तोडताना.
गडी खुश,पडला प्रेमात..मावशीला सांगून आणली तिला
आपल्या जनानखान्यात.आता राजपुत्रचतो कुणी बोलावं
मग पुढे याच बुऱ्हाणपूरात हिराबाई बरोबर प्रणयाचा
धुंद आस्वाद घेतला.सहा महिने तो बुऱ्हाणपूरात राहीला
पुढे हिराबाई वारली.तीच खर नाव हिराबाई होत पण ती
जैनाबादी बागेत भेटल्यामुळे तीच नाव जैनाबादीमहल
असं ठेवण्यात आले.(औरंगजेबा सारख्या निष्ठुर आणि कपटी माणसाला सुद्धा प्रेम होतं हे जरा नवलच वाटतंय)
असो...
आशा या औरंगजेबाच्या अंतरंगातील चिरंतर आठवणींचे
बुऱ्हाणपूर शहर फारुकी राजांपासून मोगली सम्राटांपर्यंत
गजान्तलक्ष्मीचे माहेरघर, कला आणि वाणिज्य यांचे
कीर्तीस्थान होते अत्तर आणि दक्षिणेस जोडणारा एक
मध्यबींधु म्हणून प्रसिद्ध होते.पण...अफसोस.. कारण
३० जानेवारी १६८१ रोजी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी अचानक बुऱ्हाणपूरावर झडप घातली.
त्यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता ' खानजहान "
आणि त्याचा सहाय्यक होता काकरखान अफगाण.तो
जिझियाकर वसुली अधिकारी म्हणून तेथे राहिला होता
विशेष म्हणजे ७० मैलांची मजल मारून
सरसेनापती हंबीररावमामांचा २०००० चा सेनासागर
अचानक बुऱ्हाणपूरवर येऊन कोसळा.हरणांच्या कळपात भलामोठा दाबजोर वाघ शिरावा आणि हरणांची तारांबळ उडावी तशीच काहीशी गत झाली बुऱ्हाणपूरची
मराठ्यांनी पहिला हात मारला तो बहादुरपुऱ्यावर तो अतिशय संपन्न होता.लक्षाधीश असे सराफ सावकार
तेथे राहत होते.देशोदेशीचे जिन्नस,सामानसुमन,
जडजवाहिर,सोने-चांदी,रुपये,रत्ने असा बराच
लक्षावधी रुपयांचा माल तेथील दुकानात आणि घरात
होता.तो सर्व ऐवज स्वच्छ करण्यात आला.
मराठयांची वावटळ इतक्या अनपेक्षितपणे आली आणि
तुटून पडली की माणसांना एक पैसाही हलवता आला नाही.आल्याआल्याच मराठयांनी संपुर्ण शहराची नाकेबंदी केली होती आणि ५००० घोडदळाने शहर घेरून ठेवलं होतं. सर्व १८ पुऱ्यांची मनसोक्त लूट चालू होती.ज्यावेळी लुटलेल्या पुऱ्याना मराठयांनी आगीलावल्या आणि त्याचा धूर आकाशात पोहोचला
त्यावेळी कुठे बुऱ्हाणपूरचा नायब काकरखान आणि शहरातील लोकांना मराठे आल्याची खार समजली.
मराठे आल्याची बातमी काकरखाना कळाली,बुडाला
चटका बसावा तसा खान कींचाळला " या अल्लाह ! इतनी
तदाद में ये लोग कहाँसे आये..!मराठयांनचा प्रतिकार
करण्याची त्याची हिमत नव्हती, त्याने शहराचे दरवाजे बंद केले आणि तट बुरुज वेशी इत्यादींचा बंदोबस्त करू
लागला.पण सर्व व्यर्थ
आता सर्वच्या सर्व १८ पुरे मराठयांनच्या ताब्यात होते
प्रत्येक पुऱ्यात लाखो रुपयांचा माल सराफ,व्यापारी आणि इतर लोकांनकडे होता.तीन दिवसापर्यंत मराठे
नि:शंकपणे पुरे लुटीत होते,त्यांना मुबलक प्रमाणात लुट
मिळाली.अनेक वर्षांपासून जमिनीखाली पुरलेली संपत्ती
त्यांच्या हाती पडली.ज्या संपत्तीचा घरमालकांनाही पत्ता
नव्हता ती मराठयांनी शोधून हस्तगत केली.
तिसरा दिवस उजाडला लुट जवळजवळ संपत आली होती.सोने,चांदी,मोती,जडजवाहीर आणि इतर मौल्यवान वस्तू यांच्या गोण्या भरल्यागेल्या आणि घोड्यावर लादण्या आल्या.जे वाहून नेणे शक्य नाही त्या वस्तू आणि समान तीतच टाकून देण्यात आलं व मराठयांनी
माघार घेतली,आणि निघून गेले.
बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजहान हा त्यावेळी औरंगाबादला होता.त्याला लुटिची बातमी तिसऱ्या दिवशी कळाली आणि तो ताबडतोब निघाला पण
त्याची गती मंद असल्याने मराठे चोपड्याच्या मार्गे तडक
निघून चार- पाच दिवसात साल्हेरला पोहोचले.
बुऱ्हाणपूरच्या लूट ही औरंगजेबाच्या अंत:करणास झालेली मोठी जखम होती त्याने खानजहानची चांगलीच
खरडपट्टी केली आणि त्याची बदली केली.व त्यांच्या
जागी १ मार्च १६८१ रोजी इरजखान याची नेमणूक केली
बुऱ्हाणपूरच्या लुटीसंबंधी औरंगजेबाच्या दरबारच्या
१९ फेब्रुवारी १६८१ च्या अखबारातील पुढील लेख:-
" बुऱ्हाणपूरच्या वृत्तपत्रावरून समजले की,शत्रूसैन्य एकत्र आले,या बातमीमुळे खानजहान काकरखान येथे
आला होता.त्याने किल्ला बंद करून घेऊन खबरदारी
बाळगली.शत्रूंनी सर्व पुरे लुटले.रापुतांना नी:शस्त्र केले
व तीन दिवस शहरात राहून लूट केली." ( जु.२४ सफर
१० शनीवार ) शके १६०२ फाल्गुन शुद्ध ।। १२-१९
फेब्रुवारी १६८१…
मोगली इतिहासकार लिहितो :- मराठयांनी इतक्या पद्धतशीर पणे बुऱ्हाणपूरची लूट केली,की मराठे निघून गेले,मात्र पाठीमागे फक्त हाडे शिल्लक राहिली होती...
( नंतर बरोबर तेरा वर्षांनी सरसेनापती संताजी घोरपड्यांनी परत एकदा बुऱ्हाणपूरची लूट केली.त्यावेळी
बुऱ्हाणपूरचा सुभेदार मरहमतखान होता )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...