( थोरले बाजीराव पेशवे )
लेखन :Indrajeet Khore
दिल्लीतबादशहा सादतखान आणि कमरुद्दीनखानावर खूप भडकला पेशव्यांना मारण्याच्या वल्गना करणाऱ्या या दोघांना अजून बाजीराव काय आहेत हे माहीत नव्हते
बाजीरावांना मात देईल असा कोणी रुस्थुम दिल्ली दरबारात तरी नव्हता.शेवटी दरबारी मुत्सद्दी आणि सरदारांच्या विनंतीवरून निजामाला बाजीरावांविरुद्ध
पाठवायचे ठरविण्यात आले.
वास्थवीक,निजामाने मोगल सत्तेविरुद्ध फारकत घेऊन आपला सावतासुभा उभा केला होता.म्हणून बादशहा त्याच्यावर नाराज होता.परंतु यावेळेस अखिल हिंदुस्थानात शूर,कपटी,मुत्सद्दी आणि प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेबाचा चेला निजामच काय तो मराठयांना रोखू शकतो,असा विचार बादशहाच्या मनात घोळत होता.
म्हणून बादशहाने निजामाला पत्र लिहून कळवले की
" तू मोठा समशेरबहाद्दर आहे.त्या काफर पेशव्याला मात
देऊ शकेल असा तूच एक सेनापती आहेस.तू काहीही करून दिल्लीच्या रोखाने कूच करून आमचं रक्षण कर.
त्या बदल्यात आग्रा,बुंदेलखंड,माळवा या प्रांताच्या सुभ्यांवर नासीरजंगची नेमणूक दिल्ली दरबाराकडून
केली जाईल."
निजाम तो निजामच.सुटलं तोंडाला पाणी, आता माळवा,
आग्रा,बुंदेलखंडची सुबेदारी मिळते म्हणल्यावर काय झालं.मग बादशहाला मदत केलीच पाहिजे.
लघेच निजामानं सैन्याला फर्मान सोडलं ' चलो पुणे '
प्रचंड अशी सेना घेऊन निजामानं पुण्याकडे कूच केली
बाजीरावांना ही खबर कळाली की निजाम पुण्याच्या
रोखाने निघाला आहे.सोबत दाबजोर फौज आहे.
बाजीरावांना आपल्या इलाख्यात लढाई नको होती.ल
निजाम पुणे प्रांती दाखल होण्याअगोदरच,आपणच
त्याला गाठलेला बरा.अस म्हणून बाजीराव व चिमाजीआप्पांनी लगोलग पुण्यातून कूच केली
निजामाला ही खबर नव्हती.की बाजीराव पुण्याहून निघाले आहेत.तो पूर्णपणे गाफील होता.त्याचा तळ
भोपळाला पडला होता
( ऑक्टोबर १७३७ )
बाजीरावांनी दिन-रात मजला मारून अचानक पणे
निजामाची छावणी पूर्णपणे घेरली.फास आवल्यागत
मराठयांनी वेढा दिला.जवळून नर्मदा नदी वाहत होती
खरी,पण नदीच्या काठावर पण मराठयांचा कब्जा होता
निजामाला टाचा घासत,दाताच पाणी गिळत उभं राहण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.
ही बातमी औरंगाबादजवळ असलेल्या निजामाचा
पोरग्या नासीरजंगला समजली.बापाच्या मदतीसाठी बिचारा नासीर ताबडतोब भोपळाच्या दिशेने वायूवेगाणे
निघाला.पण या सर्व गोष्टीची कल्पना बाजीरावांना होती म्हणून त्यांनी नासीरजंगचा बंदोबस्त आधीच केला होता
चिमाजीआप्पांना फौजेसह तापी नदीच्या खोऱ्यातच
पिछाडीवर थांबवलं होतं.
नासीरजंग हंडीयाच्या घाटाच्या दिशेने निघाला असता
एकदम चिमाजीआप्पांनी त्याला अडसर घातला.
नासीरजंग खालीच अडकून पडला.इकडं निजाम चांगलाच कोंडला गेला होता.मराठयांच रात्री-बेरात्रीच
छापा सत्र सुरू झालं.मराठयांन कडून सतत होणाऱ्या
गोळीबारि मुळे तर निजाम बेजार झाला.कारण मराठयांचे सततचे हल्ले.गोळीबारी मुळे त्याचे बरेच सैन्य खस्त झाले
शेवटी तर निजामाचे सैन्य लाकडाच्या आणि मातीच्या
भिंती रचून त्यामागे लपू लागले.निजाम तर आपल्या
टोलेजंग हत्तीच्या आंबारीत दडून बसला.लोकांना खणेही
अपुरे पडू लागले.अन्न एक रुपयास एक शेर मिळू लागल
घोडे,जनावरांचे खायचे हाल होऊ लागले.निजामाच्या
फौजांतल्या पठानांनी तर तोफा ओढणारे बैलच कापून काढले.राजपूत लोक गोमांस कसे खाणार?त्यांच्यावर तर
उपाशी मरायची वेळ आली.आख्खी फौज मेटाकुटीला आली.
याच दरम्यान बाजीरावांनी चिमाजीआप्पांना लिहिलेल्या
पत्रात बाजीराव म्हणतात," ऐसा प्रसंग जाहला,तेव्हा नबाब सर्वांचे दुःख पाहून बहुतच काहिला होऊन सलोखा
विसी( तहासाठी ) त्वरा केली.जो नबाब चौथाई व सरदेशमुखीची नावे घेत नव्हता त्याने माळवे दरोबस्त
ऐसे खास दस्तफाने लिहून दिले...."
निजामाने अखेर बाजीरावांन बरोबर तह केला.नर्मदा आणि चंबळा या नद्यांमधला दोआबातला सर्व प्रदेशात
व मोहिमेचा खर्च म्हणून पन्नास लक्ष रुपये द्यावेत
( बादशहाकडून देववावेत ) या आटीवर निजामाची
सुटका झाली.जो निजाम ' बाजीराव कफराला नर्मदेच्या
वर कधीच पाऊल ठेवू देणार नाही ' अशा बतावण्या
करत होता,तो निजाम स्वतःच बाजीरावांनासमोर खाल
मानेने नर्मदेच्या खाली उतरला.
मराठयांच्या या विजय तहाला " दुराई सराई करार " अस म्हणतात.डिसेंबर सन १७३७ मध्ये युद्ध झाल्यानंतर या
सर्व प्रदेशांची व्यवस्था लावून बाजीराव आणि चिमाजी आप्पांची विजयी फौज जुलै १७३८ रोजी परत पुण्यात
दाखल झाली.....।।
No comments:
Post a Comment