भाग १
खान्देश – ऐतिहासिक पार्श्वभूमी
धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते व त्याचे पूर्वेस बेरार (प्राचीन विदर्भ) व उत्तरेकडे नेमाड (प्राचीन अनुपा) व दक्षिणेकडे औरंगाबाद (प्राचीन मुलका) आणि भिर (प्राचीन असमका) हे जिल्हे होते.
पुढे हा प्रदेश यादव वंशाचा राजा सेउनचंद्र यांच्या नावावरून ‘सेउनदेश’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना ‘खान’ ही पदवी दिलेली होती व त्यावरून साजेशे ‘खान्देश’ असे या प्रदेशाचे नामकरण केले.
आर्याचा विस्तार होताना ‘अगस्थिऋषी’ यांनी प्रथमच विंध्य पर्वत पार करून दख्खन च्या पठारावर गोदावरी नदीच्या किनारी स्थायीक झाले. हा प्रदेश सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली सुध्हा होता. ‘पूष्यमित्र’ या संग राजवंशांच्या संस्थापकाने मौर्य वंशाचा पाडाव केला. पुढे या प्रदेशावर सातवाहन राज्यांनी राज्य केले.
सुमारे इ.स. २५० मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांची जागा अभिरांंनी घेतली.बंंड केलेल्या अभिरांंचा उल्लेख कलचला (गुजरात) येथील ताम्रपटावर व अजंठा येथे गुफा क्र. १२ मध्ये आढळतात. सातवाहन वंशाच्या अधःपतनानंतर विदर्भात वाकाटक साम्राज्य उदयास आले. वाकाटक साम्राज्याचे उच्चाटन राष्ट्रकुटांंनी केले. या प्रदेशावर बदमिचे चालुक्यांनी व नंतर यादवांनीही राज्य केले.
इ.स. १२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजीने रामचंद्र यादवांवर आक्रमण करुन जबर खंडणी व मोबदला वसूल केला. पुढे रामचंद्र यादवांचा मुलगा याने दिल्लीला खंडणी पाठवणे बंद केल्याने मलिक काफूर यांने इ. स.१३१८ मध्ये त्याचा पराभव करून हत्या केली.
No comments:
Post a Comment