विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 February 2021

धुळे जिल्हा प्राचीन इतिहास भाग २

 


धुळे जिल्हा प्राचीन इतिहास
भाग २
खान्देश – ऐतिहासिक पार्श्वभूमी
इ.स. १३४५ मध्ये, देवगिरीचे राज्य बहामनी वंशाच्या संस्थापक हसन गंगू यांचे कडे गेली. इ.स. १३४५ मध्ये फिरोजशहा तुघलक याने फारुकी वंशाच्या संस्थापक मलिक राजा फारुकी याला थाळनेर व करवंद हे परगने सुपूर्द केले. त्याचे कुटुंब खलीफा उमर फारूक चे वंशच असल्याचा दावा करीत असते. मालिक राजा फरुकि यांनी थाळनेर येथुन राज्याचे व्यवस्थापन केले. गुजरातचे सुलतान पहिला अहमद याने मलिक राजा यांना ‘खान्देशाचा शिपा- इ- सालार’ अशी पदवी बहाल केली. याच वरून याप्रदेशाचे नाव खानाचा देश ‘खान्देश’ असे पडले. या दरम्यान आसीरगडाचा श्रीमंत अहीर “असा” याचे गोंडवाना व खान्देश या भागांमध्ये धन्याचे गोदान उभारले. त्याची धर्मपत्नी अतिशय दानशूर असल्याने तिने आपल्या पतीकडे हि गोदामे गरिबांसाठी खुली करण्याचा आग्रह धरला या बदल्यात ‘असा’ ने त्या कारागिरांकडून किल्ला बनवून घेतला. मुख्य अहिरने संपत्ती आणि क्षमता असून देखील मलिक राजाची सत्ता मान्य केली. मलिक राजा याने त्याचा मोठा मुलगा मलिक नसिर यास सर्व सोयींनी सुशोभित असा ‘लळिंग’ किल्ला व लहान मुलगा मलिक इप्तीकार याला थाळनेर किल्ला बहाल केला. मलिक नसीरने असिरगड ताब्यात घेऊन त्याला आपली राजधानी घोषित करण्याचे योजिले.
मलिक नसीरने ‘असा’ ला पत्र लिहिले कि बागलाण, अंतुर व खेरला चे प्रमुख बंड करीत
आहेत. लळिंग शत्रू प्रदेशाला लागून असल्याने त्याने ‘असा’ ला त्याच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती हि केली. असाने मलिक नसीर च्या स्रीयांसाठी राहण्या योग्य घरांची व्यवस्था केली. मलिक नसीरने आपल्या स्रियांना चाऱ्याने झाकलेल्या गाड्यांमध्ये लपवून असिरगडला आणले. जिथे असाच्या बायको व मुलींनि त्याचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी मलिकने आणखी २०० स्रियांना पाठवत असल्याचा निरोप असाला दिला. असा व त्याचा मुलगा त्याच्या स्वागतासाठी गेला असता. त्यांना असे आढळून आले कि, चाऱ्याच्या गाड्यांमध्ये स्रियांएवजी दडून बसलेल्या शस्रधारी सैनिका असुन त्यांनी असा व त्याच्या मुलाची निर्घुण हत्या केली. विश्वासघातकी, कपटी मलिक नसीर त्यानंतर असिरगड येथे स्थलांतरित झाला. शेख झैनुद्दिन चा शिष्य शेख मलिक नसीर चे अभिनंदन करण्यास आले असता,त्याने मलिकला तापीच्या काठी दोन शहरे बसविण्याचा सल्ला दिला. व त्या प्रमाणे पूर्वेला झैनाबाद(शेख झैनुद्दिन यांच्या नावावरुन ) व पश्चिम किनारी बुऱ्हानपूर (शेख बुर्हौद्दीन दौलताबाद याच्या नावावरून).पुढे बुऱ्हानपूर फारुखी वंशाचे राजधानी झाली.
६ जानेवारी १६०१ अकबरने खान्देश आपल्या अधिपत्याखाली आणून त्याचे नामकरण आपला मुलगा दनिअल च्या नावावरून दान्देश असे केले. १६३४ मध्ये खान्देश ‘सुबा’ म्हणून घोषित केले.३ जून १८९८ रोजी पेशवांनी इंग्रजांसमोर आत्मसमर्पण केल्याने खान्देश ब्रिटीश राजवटीत सामील झाले.

No comments:

Post a Comment

फलटण संस्थान

  फलटण संस्थान फलटण  हे सातारा  जिल्ह्यातील    एक  तालुका व  शहर  आहे.  फलटण  शब्दाची उत्पत्ती  फल   उत्तन  ( अर्थात  फळबागांचा  प्रदेश ) अश...