विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 21 February 2021

नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? भाग १

 

मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न

नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले?
भाग १
मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न . या मध्ये अनेक लोकं मध्ये मतभेद आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मांडतो. मुळात हा प्रश्न ऐरणीवर सध्या आहे कारण महाराष्ट्र मधील राजकारण .वादामध्ये नानासाहेब पेशवे विरुद्ध आंग्रे च संघर्ष जास्त चर्चिला जातो.
तुळाजी आंग्रे चे मूळ चित्र १७५६ मध्ये यूरोप मधील ( Literaraly magzine of univeraal review ) मासिकं मध्ये छापून आलेले आणि विषय होता विजयदुर्ग च विजय. मराठ्यांचा हा सरखेल कान्होजी आंग्रे इतकाच पराक्रमी होता. शेकडो किलोमीटर दूर मंगलोर आणि केरळ मधील कलिकात विजय हे मराठ्या इतिहासातील दुर्लक्ष पराक्रमाचा अभिजात नायक . पण दुर्दैव म्हणजे 30 वर्ष मराठ्यांच्या कैद्येत राहून मरण आले.
काहि लोकांचे म्हणणे आहे की नाना साहेब पेशवे यांनी वैयक्तिक आकासा पोटी आंग्रे च आरमार बुडवले.
तर काही लोकांचे म्हणणे आहे की त्यावेळची परिस्थिती अशीच होती की नानासाहेब पेशवे ना पर्याय नव्हता.
काहीही असो त्या वेळी मराठ्यांचे आरमार ची ताकद कमी झाली. इंग्रजांचा उदय झाला . ज्याच्या हाती समुद्र , त्याच्या हाती सत्ता ही शिवाजी महाराजांची उक्ती त्याकाळच्या सत्ताधारी कडून दुर्लक्षित झाले. पर्यायाने इंग्रजांनी प्रभुत्व मिळाले. आणि मराठ्यांच्य विनाशाला अनेक कारणे पैकी एक कारण हे ही होते.
नानासाहेब आणि तुळाजी आंग्रे मध्ये वाद का होता याचे नक्किं कारण कळत नाही. पण १७४९ ल शाहू महाराज चे निधन झाल्यावर छत्रपती राम राजा ल आपल्या बाजूला नानासाहेबांनी वळवून घेतले.रामराजा हा ताराबाई च नातू . पण नानासाहेब आणि तुळाजी मध्ये पटले नाही. नानासाहेबांनी मराठा राज्यावर एककलमी सत्ता बनवली . पण तुळाजी तितकाच पराक्रमी त्यामुळे त्या दोघात जमले नाही. तुळाजी आंग्रे ने नानासाहेब पेशवे संघर्ष चालू केला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...