विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

शिवाजी महाराजांचे गुरु कोण?

 


शिवाजी महाराजांचे गुरु कोण?
दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु.
समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु. याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु.
हे म्हणजे अवघड झालं.
शहाजीराजे हे त्यावेळचे भारतातील सर्वात मोठे किंग मेकर आणि त्याचं पोरगं एखादा उपरा गुरू करून त्याच्या आदेशानुसार स्वराज्य निर्माण करतय. यापेक्षा मजेदार किस्सा काय असू शकतो?
बर शिवाजी महाराजांचे गुरु कोण यावरून एक किस्सा आठवला. हा किस्सा प्रत्यक्ष आमचे गुरु सह्याद्रीपुत्र मांडे सर यांनी एकदा भटकंती दरम्यान सांगितला. तोच मी इथे मांडतोय. चालता बोलता नावाचा एक कार्यक्रम मराठी चैनल वर आयोजित केला जायचा. सुनील बर्वे हा या कार्यक्रमाचा अँकर होता. हातात माईक घेऊन हा महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरात फिरून लोकांना प्रश्न विचारायचा. असाच एका कार्यक्रमादरम्यान त्याने प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांचे तेरावे गुरु कोण? लोकांनीसुद्धा उत्साहाच्या भरात वेगवेगळी उत्तरे दिली. मुळात टीव्हीला इडियट बॉक्स म्हणून हेटाळणाऱ्या आमच्या गुरुवर्यांनी हा कार्यक्रम योगायोगाने कुठेतरी पाहिला. त्यापेक्षाही मोठा योगायोग म्हणजे मांडे सरांच्या समोर हाच सुनील बर्वे एके दिवशी उभा ठाकलेला दिसला. आता ज्यांनी मांडे सरांना जवळून पाहिलय त्यांना चांगल्याप्रकारे माहित असेल की मांडे सरांनी कुठल्याही परिस्थितीत राष्ट्र आणि राष्ट्रनिर्माते शिवाजी महाराज यांच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही.
कानफाड फोडू का भडव्या तुझं म्हणत मांडे सरांनी सुनील बर्वे वर हात उगारला होता परंतु मी अभ्यासलेले शिवाजीमहाराज मी कधीच कोणावर लादणार नाही ह्या तत्वाशी एकनिष्ठ असलेले मांडे सर, त्यांनी सुनील बर्वेला एकच प्रश्न विचारला. शिवाजी महाराजांचे तेरावे गुरु कोण हा प्रश्न तू लोकांना विचारतोस याचा अर्थ असा होतो की या अगोदरही शिवाजी महाराजांना १२ गुरू होते. सांग बघू त्या बारा गुरूंची नावं.
बोबडी वळली न सुनील बर्वे ची. सारवासारव करत तो एवढेच म्हणाला की हे सर्व स्क्रिप्ट असतं आम्हाला आमच्या मनाचं बोलायची मुभा नसते हे सर्व चॅनेल वाल्यांच स्क्रिपट होत.
मांडे सरांनी त्याला ठणकावून सांगितलं तुम्ही असे ५०० गुरु शिवाजीच्या नावावर खपवा महाराज सगळ्यांना पुरून उरतील. दम असेल तर आजमावून बघा.
आज मला शहाजी राजांबद्दल प्रश्न विसरणाराना तोच प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना वाटतं शहाजी महाराजांपेक्षा दादू कोंडदेव किंवा बारा मावळातील कोणत्याही सरदाराचे किंवा वतनदाराचे अस्तित्व हे शहाजी महाराजांपेक्षा मोठे होते त्यांनी समकालीन शिवभारत हा ग्रंथ वाचावा व त्यानंतर खुले आव्हान द्यावे की कंपली ते बंगळूर यादरम्यान शिवाजी महाराजांना २३ प्रकारच्या वेगवेगळ्या विद्या शिकवणारे कोण होते? किंवा पुणे नावाच्या एका छोट्याशा भागाची जबाबदारी एका अल्पवयीन मुलावर सोपवून त्याची परीक्षा घेऊन स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे दुसरे तिसरे कोणी नसून शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे गुरु फक्त आणि फक्त शहाजी महाराजच होते.
आज शहाजी महाराजांच्या जन्मदिनादिवशी खरंतर या या विषयावर मला लिहिण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु शहाजी महाराजांना कमी लेखू पाहणाऱ्या व दादोजी कोंडदेव सारख्या एका मुलकी कारकुनाला अवाजवी महत्त्व देऊन शहाजी महाराजांसारख्या स्वराज्य संकल्पकाला कमी लेखू पाहणाऱ्या त्या सर्व तथाकथित इतिहासकारांना मी फक्त एवढेच सांगू शकतो की तुम्ही ज्या मुलकी अधिकाऱ्यांच्या नावाचा डंका पिटत असता त्या अधिकाऱ्यांच्या योगदानाबद्दल मला कधीच शंका उपस्थित करावीशी वाटली नाही परंतु त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेव्हा शिवाजी महाराज पुणे या छोट्याशा भागाचा कारभार पाहण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले तेव्हा शहाजी महाराजांनी २०० मुख्य कारभारी व इतर ६०० अधिकारी असे एकून ८०० अधिकारी बंगळूराहून शिवाजी महाराज व आईसाहेब जिजाऊ यांच्या दिमतीस पाठवले होते.
शिवभारतकाराच्या म्हणण्यानुसार शहाजी महाराजांना उत्तम अशा कवी, संस्कृतचे ज्ञानी व मुत्सद्दी यांचा आपल्या पदरी संचय करणे हा शहाजी महाराजांचा आवडता छंद होता. थोडक्यात काय तर असे हजारो दादू पंत( दादोजी कोंडदेव गोचिवडे) शहाजी महाराजांच्या पदरी होते.
कोणी कितीही आपटा, महाराज साहेब शहाजीराजे व आईसाहेब जिजाऊ हेच शिवाजी महाराजांचे गुरु.
शहाजी महाराजांच्या जन्मदिनादिवशी खरेतर अशी मला पोस्ट टाकण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु ज्यांना शिवाजी महाराजांना उपर्या गुरूंच्या दावणीला बांधण्याची प्रचंड घाई झालेली असते त्यांच्यासाठी कामातून वेळ काढून दिवसा अंती ही पोस्ट. ज्यांना कुणाला ही पोस्ट चुकीची वाटत असेल त्यांनी पुराव्यासहित याचे खंडन करावे.
-मराठा अमर दादा साळुंखे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...